Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू नयेत, अशी कडक सूचना केली आहे. सौदी अरेबियातील पाकिस्तानच्या दूतावासाने हज आणि उमराहसाठी जाणारे यात्रेकरू तसेच कामगारांसाठी विशेष अॅडव्हायजरी जारी केली आहे.
सौदी अरेबियाच्या कायद्यांचे आणि व्हिसाच्या अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन दूतावासाने केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास अटक, ताब्यात घेणे आणि देशातून हद्दपार करण्यासारखी कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. (Pakistan Saudi Arabia)



मक्का-मदीनेत भीक मागण्यावर कडक कारवाई :


पाकिस्तानी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, सौदी प्रशासन भीक मागण्याच्या आणि परवानगीशिवाय लोकांकडून पैसे मागण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई करत आहे. विशेषतः मक्का आणि मदिनेसारख्या पवित्र स्थळांच्या परिसरात अशा प्रकारांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. पाकिस्तानी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे अनधिकृतपणे पैसे गोळा करू नयेत, तसेच परवानगी नसलेल्या स्थानिक सेवा वापरू किंवा पुरवू नयेत, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे. आर्थिक मदत किंवा निधी गोळा करायचा असल्यास तो केवळ कायदेशीर माध्यमातूनच करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pakistan Saudi Arabia)



AI व्हिडिओच्या माध्यमातूनही दिला इशारा :


पाकिस्तानी दूतावासाने सोशल मीडियावर AI-निर्मित व्हिडिओ शेअर करून यात्रेकरूंना नियमांचे गांभीर्य समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला सौदी अधिकाऱ्यांकडून अटक करून तुरुंगात नेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या माध्यमातून सौदीतील स्थानिक कायदे मोडल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा संदेश देण्यात आला आहे. (Pakistan Saudi Arabia)



व्हिसाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन :


यात्रेकरू आणि कामगारांनी आपल्या व्हिसाची वैधता आणि त्यातील अटींचे पालन करणे आवश्यक आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतर सौदी अरेबियात थांबणे किंवा व्हिसाच्या श्रेणीनुसार प्रतिबंधित असलेल्या कोणत्याही कामात सहभागी होणे टाळावे, असे दूतावासाने म्हटले आहे. (Pakistan Saudi Arabia)



दरम्यान, मागील वर्षी हज यात्रेसाठी एकूण 16,73,320 भाविक सौदी अरेबियात दाखल झाले होते. त्यापैकी 15,06,576 भाविक परदेशातून आले होते. इस्लाममधील पाच प्रमुख धार्मिक कर्तव्यांपैकी हज एक असून, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम मुस्लिमांसाठी आयुष्यात किमान एकदा हज करणे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. (Pakistan Saudi Arabia)


सौदी अरेबियात धार्मिक यात्रेसाठी जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी स्थानिक कायदे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, यासाठीच ही कडक अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. (Pakistan Saudi Arabia)

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.