Nashik : कुंभनगरीचा नावलौकिक देश-विदेशात उंचावण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गिरीश महाजन

Nashik : कुंभनगरी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांचे आभार व्यक्त करतो. नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) जिल्ह्याच्या विकासाला आणि गती देण्यासाठी तसेच कुंभनगरीचा नावलौकिक देश-विदेशात अधिक उंचावण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Guardian Minister Girish Mahajan) यांनी स्पष्ट केले.



जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. शासन, प्रशासन आणि जनतेच्या समन्वयातून नाशिकच्या विकासाची गती वाढविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येणार आहे. नाशिकची ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि औद्योगिक ओळख अधिक मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था, पर्यटन, रोजगारनिर्मिती आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे.



पायाभूत सुविधांचे नियोजन आणि विकासकामांमध्ये दूरदृष्टी


आगामी कुंभमेळा हा नाशिकच्या विकासासाठी मोठी संधी असून, या माध्यमातून नाशिकची ओळख देशासह जागतिक स्तरावर अधिक ठळक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या विकासकामांचा दीर्घकालीन फायदा नाशिककरांना मिळावा, यासाठी पायाभूत सुविधांचे नियोजन आणि विकासकामांमध्ये दूरदृष्टी ठेवली जाणार आहे. नाशिकच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला चालना देतानाच युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, शहर आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, तसेच जिल्ह्यातील विविध भागांचा संतुलित विकास साधणे यावरही भर दिला जाणार आहे. नाशिकच्या विकासाला नवी दिशा आणि नवी गती देण्यासोबतच नाशिककरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच कुंभनगरीचा नावलौकिक देश-विदेशात अधिक उंचावण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे मंत्र महाजन यांनी नमूद केले.



सेवक म्हणून काम करण्याचा निर्धार


नाशिकच्या विकासासाठी पालक म्हणून नव्हे, तर सेवक म्हणून काम करण्याचा निर्धार महाजन यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व घटकांच्या अपेक्षा, समस्या आणि गरजा जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाईल. आपल्यावर सोपविण्यात आलेल्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर