Gold mine collapses : खोदकामादरम्यान सोन्याची खाण कोसळली; 30 कामगारांचा मृत्यू, अनेक जण अडकले

बांगुई: मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकामध्ये सोन्याची खाण कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. देशाच्या पश्चिम भागातील नाना-माम्बेरे प्रांतातील अब्बा परिसरात ही घटना घडली. खाणीत काम सुरू असताना अचानक खाणीचा काही भाग कोसळला. त्यावेळी आत अनेक कामगार उपस्थित होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 30 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Gold Mine Accident)


मिळालेल्या माहितीनुसार, खाण कोसळल्यानंतर स्थानिक कामगार आणि नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखालून 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले. काही जखमी कामगारांनाही बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, अजूनही काही कामगार खाणीत अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  (Central African Republic)



स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर बचाव पथकांकडून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावरील परिस्थिती अत्यंत गंभीर असून, अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. (Mining Accident)


मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकमध्ये छोट्या आणि पारंपरिक पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या खाणींची संख्या मोठी आहे. या ठिकाणी हजारो कामगार सोने आणि इतर खनिजांच्या उत्खननाचे काम करतात. मात्र, अनेक खाणींमध्ये पुरेशा सुरक्षा उपायांचा अभाव असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे.


या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून बचावकार्याला वेग देण्यात आला आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांप्रति सरकारी अधिकाऱ्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून, दुर्घटनेतील बाधितांना आवश्यक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. (Central African)


Comments
Add Comment

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी