ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. ब्रूकने ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची ब्रूकची ही चौथी वेळ आहे. त्याने डिसेंबर २०२४ मध्ये पहिल्यांदा ही कामगिरी केली होती.



बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील खराब कामगिरमुळे हेडच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. त्याने सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये अनुक्रमे २२ आणि १७ धावा केल्या. बांगलादेशकडून ऑस्ट्रेलियाला ९ गडी राखून दारुण पराभव पत्करावा लागला. या कामगिरीनंतर, हेड तीन स्थानांनी घसरून चौथ्या स्थानावर आला आहे. दरम्यान, इंग्लंडचा जो रूट दुसऱ्या स्थानावर, तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. स्मिथने बांगलादेशविरुद्ध ७१ आणि ४४ धावा केल्या. आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल चार फलंदाजांमध्ये केवळ ३३ रेटिंग गुणांचा फरक आहे. अशा परिस्थितीत, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील मायदेशातील कसोटी मालिका आणि बांगलादेश व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीनंतर क्रमवारीत आणखी एक मोठा बदल होऊ शकतो.



बांगलादेशचा कर्णधार नाझमुल होसेन शांतोने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याने नऊ स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम २० वे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात शांतोने ८४ धावा करून बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयाचा पाया रचला. या कामगिरीमुळे त्याने भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि बांगलादेशचा लिटन दास यांना मागे टाकले आहे. अफगाणिस्तानचा डावखुरा फलंदाज सेदिकुल्ला अटलने या आठवड्यात आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत सर्वाधिक प्रगती केली आहे. त्याने आयर्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे १४३ आणि ९८ धावा केल्या. या कामगिरीमुळे अटलला ३७ स्थानांनी पुढे जात ३३ वे स्थान मिळवण्यात मदत झाली आहे. आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरनेही ८४ आणि ९६ गुणांसह २३ स्थानांची झेप घेतली आहे. तो आता ३६ व्या क्रमांकावर आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून