Shiv Sena UBT : उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील महाराष्ट्र आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उबाठा गटाचे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक अमित भाद्रीचा, आशिष पढयार, विनायक डायरे तसेच मुंबई समन्वयक प्रथमेश बोऱ्हाडे, स्वप्नील सावंत, ॲड. दक्षता ठाकूर आणि सुशांत कावीर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे. (Shiv Sena)


शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केले. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून शिवसेनेत दाखल झालेल्या या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच पक्षाचे विचार आणि विकासाचे काम अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. (UBT)



सोशल मीडिया हे सध्याच्या काळातील जनतेशी संवाद साधण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाचा योग्य आणि सकारात्मक पद्धतीने वापर करून शिवसेनेचे विचार, पक्षाची भूमिका, सरकारच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी सोशल मीडिया विभागावर आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमांपुरते सोशल मीडिया काम मर्यादित न ठेवता, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांना आणि अपेक्षांना व्यासपीठ देण्याचे कामही सोशल मीडिया विभागाने करावे, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. (Shive sena Joining)


दरम्यान, उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाच्या सोशल मीडिया संघटनेला मुंबई तसेच महाराष्ट्राच्या पातळीवर आणखी बळ मिळाले आहे. आगामी काळात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच पक्षाचे विचार आणि विविध विकासकामे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया विभागाच्या माध्यमातून व्यापक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी शिवसेना सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा, मुंबई विभाग प्रमुख राज कुळकर्णी, महादेव सलवडे, मयुर मगर तसेच सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. (Maharsahtra Politics)

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून