Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे तुफान चर्चेत आला होता. या वादग्रस्त प्रकरणातील अटकेनंतर त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठी उलथापालथ झाली होती. तुरुंगात घालवलेले ते दिवस, मीडियामध्ये पसरलेल्या घटस्फोटाच्या बातम्या आणि त्या काळात आलेले नैराश्य यावर राज कुंद्राने एका मुलाखतीत अत्यंत मोकळेपणाने भाष्य केले आहे. आर्थर रोड जेलमध्ये असताना मनात आत्महत्येचा विचार कसा आला होता आणि शिल्पाच्या एका फोन कॉलने त्याला कशी ताकद दिली, याचा उलगडा त्याने केला आहे.



"ट्विटरवरून कळाले मला अटक झाली आहे!"


एका मुलाखतीदरम्यान राज कुंद्राने अटकेच्या त्या दिवशीचा प्रसंग सांगताना स्पष्ट केले की, तो फक्त चौकशीसाठी पोलिसांकडे गेला होता. परंतु पोलीस ठाण्यात पोहोचताच, सोशल मीडिया (ट्विटर) वरून त्याला स्वतःच्या अटकेची बातमी समजली. पोलिसांकडे विचारणा केली असता वरिष्ठांचे असेच आदेश असल्याचे त्याला सांगण्यात आले. ही बातमी शिल्पालाही मीडियाच्या माध्यमातूनच कळाली. त्यावेळी त्याच्या कंपन्यांमध्ये तब्बल ४ हजार कर्मचारी कार्यरत होते. इतका मोठा व्यवसाय आणि कुटुंब कसे सांभाळायचे, हा प्रश्न शिल्पाला पडला होता; तर दुसरीकडे राजला दोन महिने तुरुंगात घालवावे लागले होते.



आयपीएल मालकापासून ते थेट आर्थर रोड जेल!


आपल्या आयुष्यात अचानक झालेल्या या बदलाची आठवण करून देताना राज म्हणाला, "एके दिवशी मी आयपीएल टीमचा मालक होतो आणि दुसऱ्याच दिवशी थेट तुरुंगाच्या कोठडीत पोहोचलो होतो. माझं डोकं पूर्णपणे सुन्न झालं होतं." जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने नव्याने सुरुवात केली असली, तरी आर्थर रोड जेलमधील तो काळा टप्पा विसरणे अशक्य असल्याचे त्याने नमूद केले. तुरुंगातील भीषण परिस्थितीशी तो संघर्ष करत असतानाच बाहेर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भलत्याच चर्चा सुरू झाल्या होत्या.



घटस्फोटाच्या अफवेमुळे आयुष्य संपवण्याचा विचार


तुरुंगात असतानाच शिल्पा शेट्टी त्याला घटस्फोट देणार असल्याच्या बातम्या मीडियात पसरल्या. ही बातमी राजपर्यंत पोहोचताच तो आतून पूर्णपणे खचला. राज म्हणाला, "त्या बातम्या वाचून मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो, रात्रभर मला झोप लागली नाही. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. आता जगण्यात काहीच अर्थ उरला नाही, असे मला वाटू लागले; कारण माझ्यासाठी माझी पत्नी आणि कुटुंबच सर्वस्व होते." या नैराश्यामुळे त्याने आयुष्य संपवण्याचा टोकाचा विचार केला होता.



शिल्पाच्या एका फोन कॉलने दिला आधार


दुसऱ्या दिवशी राजने कसेबसे शिल्पाशी फोनवरून बोलणे केले. त्या वेळी शिल्पाने त्याला धीर देत घटस्फोटाच्या सर्व बातम्या निव्वळ अफवा आणि फालतू असल्याचे सांगितले. "मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे," या शिल्पाच्या शब्दांनी राजला एक नवे आयुष्य आणि मानसिक ताकद दिली. "शिल्पाच्या त्या एका फोननंतर मला कशाचीच भीती उरली नाही. माझी पत्नी माझ्यासोबत आहे, आता जग काय म्हणतंय याने मला काहीच फरक पडत नाही," असे सांगत राज कुंद्राने त्या कठीण काळात शिल्पाने दिलेल्या साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या