Shivsena: एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास; उबाठा, मनसेसह विविध पक्षांना धक्का, शिवसेनेत मोठे इनकमिंग

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राज्यभरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्ते शिवसेनेत (Shivsena) दाखल झाले आहेत. मंगळवारी (१८ ऑगस्ट) मुंबईतील नंदनवन निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उबाठा गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि बहुजन हक्क अभियानाशी संबंधित अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे राज्यातील विविध भागांत शिवसेनेच्या संघटनविस्ताराला बळ मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.



बार्शी आणि सांगोल्यातून मोठे इनकमिंग :


माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुढाकाराने बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुजाता डोळसे, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह १३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये विविध स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. (Shivsena)



उबाठा गट आणि बहुजन हक्क अभियानालाही धक्का :


बार्शीतील उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन हक्क अभियानाचे बार्शी तालुकाध्यक्ष सचिन पालखे, श्रीकांत गायकवाड, दर्शन देशमुख, महिला अध्यक्ष बबिता मोकाशी यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले. (Shivsena)



चंद्रपुरातही शिवसेनेची ताकद वाढली :


चंद्रपूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, जिवती नगर परिषदेचे नगरसेवक मारुती भुमरे यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील संघटनात्मक विस्ताराला बळ मिळाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. (Shivsena)



मनसेच्या पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेत प्रवेश :


आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकाराने मुंबईतील मनसेचे माजी सरचिटणीस संतान फर्नांडिस, विभाग अध्यक्ष अमृत जावळे, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर मनीष अडविलकर आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महिला बॉडीबिल्डर दीपा सप्रे यांच्यासह मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मर्चंट नेव्ही क्षेत्रातील रविंद्र बाईंग, सुरेश साळसकर, नंदकुमार बाईंग आणि मिहिर पुरोहित यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा स्वीकारला. (Shivsena)



मुंबई आणि पनवेलमध्येही पक्षप्रवेश :


ईशान्य मुंबईतील सोशल मीडिया उपाध्यक्ष राज गोळे, हेमंत दळवी, सुनील मेढेकर, सोनाली सोळंकी आणि दीपक बोर्डे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवशाही केबल आणि इंटरनेट असोसिएशनचे अध्यक्ष परेश तेलंग, सरचिटणीस सूर्यकांत रेवडेकर, भगवान लुडबे, लक्ष्मण गरड यांच्यासह केबल चालकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मनसे केबल सेनेचे उपसचिव भारत लुडबे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस बाबा नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. शेकापचे जनरल सेक्रेटरी अशोक नाईक, प्रदीप पटेल, अनिल माने, विकास जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही भगवा झेंडा हाती घेतला. (Shivsena)



आगामी काळात संघटनविस्ताराला वेग?


राज्यातील विविध भागांतून स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असल्याने पक्षाच्या संघटनविस्ताराला व्यापक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांतील स्थानिक पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढण्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Shivsena)




Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी