Mumbai Local : किरकोळ वाद झाला अन् प्रवाशाला चक्क धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिलं

मुंबई : चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या डब्यातून खाली ढकलून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वांद्रे खाडीच्या पुलावर ट्रेन आलेली असताना हा भयानक प्रकार घडला असून या दुर्घटनेत खाली पडलेला प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. (Mumbai Local)


समोर आलेल्या माहितीच्या आधारे, ही घटना लोकल ट्रेनच्या दिव्यांगाच्या डब्यात घडली. ट्रेन चर्चगेटवरून बोरिवलीच्या दिशेने जात असताना, वांद्रे खाडीजवळ अचानक दोन प्रवाशांमध्ये काही कारणावरून किरकोळ वाद सुरू झाला. हा किरकोळ वाटणारा वाद पाहता पाहता विकोपाला गेला आणि चिडलेल्या एका प्रवाशाने दुसऱ्या व्यक्तीला थेट धावत्या ट्रेनमधून बाहेर धक्का दिला. ट्रेनचा वेग जास्त असल्यामुळे आणि खाली खाडीचा भाग व ट्रॅक असल्यामुळे संबंधित व्यक्ती खाली पडल्याने अत्यंत गंभीर जखमी झाली.


या घटनेची माहिती मिळताच वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी (GRP) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला तातडीने वांद्रे पश्चिमेकडील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.(Mumbai Local)


दरम्यान, प्रवाशाला धक्का देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या आरोपीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून सध्या या आरोपीची सखोल चौकशी सुरू असून, हा वाद कशावरून झाला होता व यामागची नेमकी कारणं काय आहेत, याचा शोध घेतला जात आहे. दिव्यांगासाठी राखीव असलेल्या डब्यात अशा प्रकारे हिंसक घटना घडल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. रेल्वे पोलिसांकडून डब्यांमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Mumbai Local)

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने