Kenya Helicopter Crash : केन्यामध्ये सफारीसाठी निघालेल्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; 5 अमेरिकन पर्यटकांसह सर्व 7 जणांचा मृत्यू

नैरोबी : केन्यामध्ये पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलटसह सर्व सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच अमेरिकन पर्यटक, इक्वाडोरमधील एक अधिकारी आणि एका अमेरिकन पत्रकाराचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. (Kenya Helicopter Crash)



लोइसाबा वाइल्डलाइफ रिझर्व्हमधून उड्डाण केल्यानंतर अपघात :


‘एएफपी’च्या वृत्तानुसार, केन्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने (KCAA) दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी ९ वाजून १३ मिनिटांनी झाला. हेलिकॉप्टरने लोइसाबा वाइल्डलाइफ रिझर्व्हमधून उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच ते दुर्घटनाग्रस्त झाले.अपघाताची माहिती मिळताच बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. केन्या रेड क्रॉसने सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये अपघातस्थळी हेलिकॉप्टरचे अवशेष आणि आग लागल्याचे दिसत होते. (Kenya Helicopter Crash)



अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट :


हेलिकॉप्टर नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. अपघातस्थळी पोहोचण्यासाठी अनेक संस्थांचे पथक प्रयत्न करत असल्याचे केन्या रेड क्रॉसने सांगितले. (Kenya Helicopter Crash)



सांबुरू पर्यटकांमध्ये लोकप्रिय :


केन्याच्या उत्तरेकडील सांबुरू परिसर हा नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने सफारीसाठी येतात. परिसरातील पर्वतीय भाग आणि वन्यजीवांचे हवाई दृश्य पाहण्यासाठी हेलिकॉप्टर सेवांचाही वापर केला जातो. दरम्यान, याच वर्षी मार्चमध्ये पश्चिम केन्यामध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत एका खासदारासह सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या नव्या दुर्घटनेनंतर केन्यामधील हेलिकॉप्टर सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. (Kenya Helicopter Crash)

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.