BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी, पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीमधील भारताचे आव्हान संपुष्टात आले. महिला एकेरीमध्ये पीव्ही सिंधूला चीनच्या वांग झी यीकडून पराभव पत्करावा लागला, तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टी इंडोनेशियाच्या अल्वी फरहानकडून पराभूत झाला. आयुष शेट्टीने पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या शी यू चीला पराभूत करून खळबळ उडवून दिली होती, परंतु उपांत्यपूर्व फेरीत १२ व्या क्रमांकाच्या खेळाडूकडून तो १९-२१, ११-२१ ने पराभूत झाला. फरहानसोबतची आयुषची ही आठवी लढत होती आणि त्यात त्याचा पाचवा पराभव झाला. या पराभवामुळे पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. लक्ष्य सेन एक दिवसापूर्वी ९२ व्या क्रमांकाच्या अमेरिकन खेळाडू गॅरेथ टेनकडून पराभूत झाला होता.



तिसऱ्या मानांकित वांगने पाच वेळच्या पदक विजेत्या सिंधूला २१-११, १५-२१, २१-१७ असे हरवले. आठ सामन्यांनंतर, जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चिनी खेळाडूकडून झालेला भारतीय स्टारचा हा पहिलाच पराभव होता. गेल्या वर्षी याच स्पर्धेत सिंधूने वांगला हरवले होते, पण यावेळी ती अपयशी ठरली. आता उपांत्यपूर्व फेरीत वांगचा सामना डेन्मार्कच्या लाइन क्रिस्टोफरसेनशी होईल, जिने सहाव्या मानांकित पुत्री कुसुमा वरदानीला हरवले आहे. गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली यांनी बॅडमिंटन जागतिक चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठून एक मोठा उलटफेर घडवला आहे. आता त्या पदकापासून केवळ एक विजय दूर आहेत. गुरुवार, २० ऑगस्ट रोजी, या भारतीय जोडीने जपानच्या सातव्या मानांकित रिन इवानागा आणि केई नाकानिशी यांना हरवून स्पर्धेत एक मोठा उलटफेर घडवला. जागतिक क्रमवारीत ३९ व्या क्रमांकावर असलेल्या त्रिशा आणि गायत्री संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. इंदिरा गांधी स्टेडियमवर हा आत्मविश्वास पुन्हा एकदा दिसून आला, जेव्हा त्यांनी सातव्या मानांकित जोडीला २१-१६, २१-१२ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात