Nashik FDA Raid : नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई, गंगापूर रोडवरील ‘या' हॉटेलचा परवाना निलंबित

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये एफडीएकडून कारवाईचे सत्र सुरु आहे. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर नाशिकमध्ये एफडीएकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अशातच आता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गंगापूर रोड परिसरातील (Gangapur Road) प्रसिद्ध ‘मे. अवंती स्नॅक्स’ या हॉटेलचा अन्न परवाना प्रशासनाने तातडीने निलंबित केला आहे.अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेंतर्गत नाशिकमध्ये (Nashik) ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.



मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने मंगळवारी गंगापूर रोड, पंपिंग स्टेशन परिसरातील मामामुंगी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या अवंती स्नॅक्सवर छापा टाकला. या तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ च्या अंतर्गत स्वच्छता आणि अन्न हाताळणीबाबत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. दरम्यान, या नियमावलीच्या तरतुदींचा भंग झाल्याने एफडीएने बुधवार पासून अवंती स्नॅक्सचा परवाना निलंबित केला आहे.



तपासणीत काय त्रुटी आढळल्या ?


अस्वच्छता : कच्चे अन्नपदार्थ स्वीकारताना आवश्यक ती तपासणी केली जात नव्हती, तसेच भिंतींची रंगरंगोटी व स्वच्छता राखली गेली नाही


वृत्तपत्रांचा वापर : तयार अन्नपदार्थ ठेवण्यासाठी आणि ते ग्राहकांना देण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर केला जात होता.


वैद्यकीय तपासणीचा अभाव : महत्त्वाचे म्हणजे आस्थापनेत काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती.


कीटक नियंत्रण नाही : उपाहारगृहात पेस्ट कंट्रोल केलेले नव्हते.


Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला