Prince Harry Meghan Markle UK Return : सहा वर्षांचा ‘वनवास’ संपणार? प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत; मुलं शाही कुटुंबाच्या जवळ जाणार

लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्तांनी पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. ब्रिटिश माध्यमांच्या काही रिपोर्ट्सनुसार, ससेक्सचे ड्यूक आणि डचेस ऑगस्टच्या अखेरपर्यंत अमेरिका सोडून ब्रिटनमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत आहेत. (Prince Harry Meghan Markle UK Return)


या संभाव्य परतीसोबत त्यांची दोन्ही मुलं, प्रिन्स आर्ची आणि प्रिन्सेस लिलिबेट, ब्रिटनमधील शाळेत दाखल होणार असल्याचेही वृत्त आहे. मात्र, हॅरी आणि मेगन यांची ‘वर्किंग रॉयल्स’ म्हणून अधिकृत शाही भूमिकेत पुनरागमन होणार नसल्याचे रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे. (Prince Harry Meghan Markle UK Return)



लंडनबाहेर खासगी घरात राहण्याची शक्यता :


‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, हॅरी आणि मेगन या महिन्याच्या अखेरीस अमेरिका सोडून युनायटेड किंगडममध्ये राहण्याची योजना आखत आहेत. लंडनच्या बाहेरील एका खासगी निवासस्थानी ते राहू शकतात. हे निवासस्थान अधिकृत शाही मालमत्तेचा भाग नसल्याचे सांगितले जात आहे. काही ब्रिटिश माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, सात वर्षांचा प्रिन्स आर्ची आणि पाच वर्षांची प्रिन्सेस लिलिबेट यांचे ब्रिटनमधील एका शाळेत नाव नोंदवण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सत्रापासून ते शाळेत जाण्याची शक्यता आहे. (Prince Harry Meghan Markle UK Return)



2020 मध्ये सोडल्या होत्या शाही जबाबदाऱ्या :


प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी 2020 मध्ये ‘वर्किंग रॉयल्स’ म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे दाम्पत्य उत्तर अमेरिकेत गेले आणि पुढे कॅलिफोर्नियातील मॉन्टेसिटो येथे स्थायिक झाले. शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर हॅरी आणि मेगन यांनी दिलेल्या विविध मुलाखती आणि सार्वजनिक वक्तव्यांमुळे शाही कुटुंबातील मतभेद चर्चेत आले. ओपरा विन्फ्रे यांना दिलेली मुलाखत तसेच हॅरीचे आत्मचरित्र ‘Spare’ यामुळेही मोठी चर्चा झाली होती. (Prince Harry Meghan Markle UK Return)



किंग चार्ल्स यांना माहिती दिल्याचा दावा :


प्रेस असोसिएशनच्या (PA) वृत्तानुसार, किंग चार्ल्स तिसरे यांना या संभाव्य परतीची माहिती रविवारी देण्यात आली होती. कुटुंबातील सदस्यांशी अधिक वेळ घालवण्याची संधी मिळाल्यास किंग चार्ल्स त्याचे स्वागत करतील, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. मात्र, हॅरी आणि मेगन यांच्या अधिकृत शाही दर्जात कोणताही बदल होणार नसून ते राजघराण्याच्या वतीने सार्वजनिक जबाबदाऱ्या पार पाडणार नाहीत. (Prince Harry Meghan Markle UK Return)



जुलैमध्ये झाली होती खासगी भेट :


रिपोर्ट्सनुसार, हॅरी आणि मेगन जुलैच्या सुरुवातीला मुलांसह ब्रिटनमध्ये आले होते. यावेळी त्यांची किंग चार्ल्स यांच्यासोबत खासगी भेट झाल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी हॅरीने आपल्या वडिलांसोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा सार्वजनिकपणे व्यक्त केली होती. दरम्यान, हॅरीचे मोठे भाऊ आणि ब्रिटिश सिंहासनाचे उत्तराधिकारी प्रिन्स विलियम तसेच त्यांची पत्नी कॅथरीन यांना या संभाव्य परतीची माहिती आधीपासून होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Prince Harry Meghan Markle UK Return)



अमेरिकेतील अपेक्षित यश न मिळाल्याची चर्चा :


शाही घडामोडींचे विश्लेषक रिचर्ड फिट्झविलियम्स यांनी या संभाव्य परतीला ‘असाधारण घडामोड’ म्हटले आहे. अमेरिकेत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळे हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याचा विचार करत असावेत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. हॅरी आणि मेगन यांनी 2020 मध्ये नेटफ्लिक्ससोबत मोठा करार केला होता. मात्र, त्यांच्या काही प्रकल्पांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा आहे. 2025 मध्ये नेटफ्लिक्ससोबत नव्या कराराची घोषणा झाली होती, मात्र तो आधीच्या कराराच्या तुलनेत अधिक मर्यादित असल्याचे सांगितले जाते. (Prince Harry Meghan Markle UK Return)



कॅलिफोर्निया आणि पोर्तुगालमधील मालमत्ता कायम ठेवणार?


‘द सन’च्या रिपोर्टनुसार, हॅरी आणि मेगन कॅलिफोर्नियातील मॉन्टेसिटो येथील त्यांचे घर कायम ठेवू शकतात. याशिवाय पोर्तुगालमधील त्यांची मालमत्ताही ते कायम ठेवण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी त्यांच्या ब्रिटनमध्ये परतण्याच्या वृत्तांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांची संभाव्य ब्रिटन वापसी आणि मुलांच्या शाळेबाबतची माहिती अधिकृतपणे स्पष्ट होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Prince Harry Meghan Markle UK Return)

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे