Maharashtra Politics : ‘पक्ष आणि चिन्ह गोठवणाऱ्यांनी विचारही गोठवावेत का?’; शिवसेनेचे व्यंगचित्रातून उबाठा गटावर टीकास्त्र

मुंबई : शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. उबाठा गटाच्या या भूमिकेवर शिवसेनेने सोशल मीडियावर एक व्यंगचित्र प्रसिद्ध करत टीका केली आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मुद्दा उपस्थित करत उबाठा गटाला लक्ष्य करण्यात आले आहे. (Shiv Sena)


शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे न्यायालयासमोर उभे असून, ‘यांच्याकडे बाळासाहेबांचे विचारही आहेत, तेही गोठवा,’ असा आशय मांडण्यात आला आहे. व्यंगचित्रात भगवा ध्वज, धनुष्यबाणाचे चिन्ह आणि वाघाचे चित्र दाखवण्यात आले आहे. तसेच शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही चित्र त्यात आहे.


व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि राष्ट्रहिताचे विचार हे शिवसेनेच्या राजकीय भूमिकेचा महत्त्वाचा भाग असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. ( Uddhav Thackeray)



पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या मागणीसोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनाही गोठवता येईल का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. हे विचार केवळ एखाद्या व्यक्तीपुरते मर्यादित नसून शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीशी जोडलेले असल्याचा दावाही करण्यात आला आहे.


धनुष्यबाण चिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हे व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. या माध्यमातून पक्षाने उबाठा गटाच्या भूमिकेवर राजकीय टोला लगावला असून, बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा कोण पुढे नेत आहे, यावरूनही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ( Balasaheb Thackeray)


दरम्यान, धनुष्यबाण चिन्हाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या प्रकरणात पुढील सुनावणी आणि निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून