Nashik : हरिहर गडावर जाण्याचा प्लॅन करताय थांबा ! कारण आता...

Nashik : हरिहर गड (Harihar Fort) हा नाशिक जिल्ह्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि थरारक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) रांगेत असून, खडकात कोरलेल्या त्याच्या ८० अंश तीव्र उताराच्या पायऱ्यांसाठी हा जगभरात ओळखला जातो. पावसाळयानंतर तर हा गड हिरवाईने नटलेला असतो, अशावेळेस पर्यटक याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र आता या चित्तथरारक उभ्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक हरिहर गडावर (Harihar Fort) प्रशासनाने पर्यटकांना पुन्हा एकदा प्रवेशबंदी लागू केली आहे.



हरिहर गडावर पर्यटकांना प्रवेशबंदी


​वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर संपत देवकर (Shekhar Sampat Devkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात गडाच्या खड्या पायऱ्या अत्यंत निसरड्या होतात. दाट धुके, अचानक बदलणारे हवामान आणि जोरदार पावसामुळे अपघाताचा मोठा धोका असतो. तसेच क्षमतापेक्षा जास्त गर्दी होणे, पर्यटक (Tourist) वनक्षेत्रात हरवणे आणि तरुणांकडून होणारी हुल्लडबाजी वा धोकादायक सेल्फीचे प्रकार यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हरिहर गडावर पुन्हा एकदा पर्यटकांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. त्र्यंबक प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने (Trimbak Regional Range Forest Officer) बुधवारी (दि. १९) अधिकृत आदेश जारी केला आहे.



प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन


या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी त्र्यंबक वनपाल, मेटेउभाडे वनरक्षक, संयुक्त वन व्यवस्थापन समिती (हर्षवाडी) आणि कळमुस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंचांना निर्देश दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत गड पर्यटनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत सर्व पर्यटकांना हरिहर गडाकडे न जाण्याचे आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.

Comments
Add Comment

Nashik : गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या तडीपार गुन्हेगारांची ‘धरपकड’ मोहीम

Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी