UBT : धाराशिव जिल्ह्यात 'उबाठा'ला खिंडार

- १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राणा जगजीतसिंह पाटलांनी ओमराजे-कैलास पाटलांना दिला मोठा धक्का


मुंबई : धाराशिव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार पडले आहे. कळंब नगरपालिकेतील उबाठाच्या गटनेत्यासह सर्वच्या सर्व १० नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. सोलापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Ravindra Chavan)


उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत धाराशिवमधील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. मात्र, कळंब नगरपालिकेच्या या सर्व नगरसेवकांनी त्या बैठकीकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली होती. त्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आधीच रंगली होती. अखेर या नगरसेवकांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Ubatha)


या राजकीय घडामोडीमुळे स्थानिक पातळीवर भाजप नेते तथा आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि उबाठाचे आमदार कैलास पाटील यांना तगडा राजकीय झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण, ओमराजे या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्न करीत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश उबाठा गटासाठी मोठा चिंतेचा विषय बनला असून, जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने