Gym trainer commits suicide : परळीत जिम ट्रेनर तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

बीड: परळी शहरातील इंदिरानगर परिसरात एका २३ वर्षीय जिम ट्रेनर तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. तुलसी संजय कमळु असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून, या तरुण आणि होतकरू तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याने परळी शहरात आणि संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.



नेमकी घटना काय?


तुलसी परळी शहरातील एका जिममध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत होती आणि परिसरात ती अत्यंत मनमिळाऊ व परिचित होती. गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेच्या वेळी तिचे कुटुंबीय बाहेरगावी गेले असल्यामुळे ती घरी एकटीच होती. याच एकांतात तिने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.



पोलिसांकडून तपास सुरू


घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तुलसीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा सखोल तपास फौजदार चव्हाण यांच्याकडून केला जात असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी कसून चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'