BM C : मुंबईत धूर फवारणीच्या नगरसेवकांची बोंबाबोंब

धूर फवारणींची मशिन्स पडतात बंद


प्रत्येक नगरसेवक प्रभागात एक मशिन्स खरेदीची केली स्थायी समितीत मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धुम्र फवारणी आणि औषध फवारणी केली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासन करत असले तरी प्रत्यक्षात धुर फवारणींची बोंबाबोंबच आहे. धूर फवारणी करणारी मशिन्स वारंवार बंद पडत असून यामुळे संपूर्ण विभागात धूर फवारणी होत नाही. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात नव्याने मशिन्स खरेदी करण्यात यावीत अशी मागणी स्थायी समितीच्या सदस्यांनी केली.



महापालिकेच्या बी विभागात किटक नाशक विभागाच्यावतीने पावसाळ्यातील आजारांसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव आला असता सभागृहनेते गणेश खणकर यांनी धूर फवारणी बाबत प्रशासनाची यंत्रणा कमी पडत असल्याचे सांगितले. धूर फवारणी मशिन्सची माहितीही उपलब्ध नाही.त्यामुळे प्रत्येक वॉर्डात एक मशिन्स उपलब्ध करून दिली जावी अशी मागणी केली. तर शिवसेनेचे अमेय घोले यांनी धुर फवारणी करणारे दिसतच नसल्याचे सांगत पहिल्या जागेवर धूर फवारणी केल्यानंतर पुन्हा त्या जागी यायला दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो असे सांगितले. तर अद्यापही वॉडनिहाय शेड्युल्ड येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर लेप्टोचे रुग्णही वाढत असल्याने उंदीर मारण्याचा प्रयत्न केला जावा अशी सूचना केली. तर प्रिती सातम यांनी लहानपणी मुले धूर मारणाऱ्यांच्या पाठिशी फिरायचे. परंतु त्यांचे विभाग कव्हरच होत नाही. तर दहा ते पंधरा मिनिटांत मशिन्स बंद पडतात. त्यामुळे हे धूर फवारणी कागदावरच नसावी तर प्रत्यक्षात दिसून यावी आणि त्याचा फायदा जनतेला व्हावा अशी सूचना केली. तर तेजिंदर तिवाना यांनी ही धूर फवारणी म्हणून जनतेच्या डोळयात धुळ फेक आहे. पण अशाप्रकारे धूर फवारणी करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून योग्य आहे का?याचा काही अहवाल आहे का याची माहिती द्यावी. तसेच किती मशिन्स चालू आहे आणि किती बंद आहे याची माहिती द्यावी अशी मागणी केली.


यावेळी झालेल्या चर्चेत यशवंत किल्लेदार, शीतल गंभीर, तुलिफ मिरांडा, रमाकांत रहाटे, लक्ष्मी भाटीया, दिपमाला बढे, श्रध्दा जाधव. मिनाक्षी पाटणकर आदींनी भाग घेत आपल्या विभागातील किटक नाशक विभागासंदर्भात तक्रारी मांडल्या. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सध्या किटक नाशक विभागाच्यावतीने स्टँडबाय काम सुरु आहे. सभागृहनेत्यांसह सर्व नगरसेवकांनी चिंता आणि मागणी केली आहे. त्यादृष्टीकोनातून काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा सविस्तर अहवाल सादर केला जावा. कारण सध्या ज्याप्रकारे डेंग्यू आणि मलेरियाची साथ फैलावत आहे, त्याची काळजी घेण्यात प्रशासनाची बेफिकीरी आहे किंवा त्यांची अनभिन्न्नता आहे असेच म्हणावे लागेल असे सांगत चिंता व्यक्त केली.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने