Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद आता अधिकच चिघळला आहे. सुरुवातीला केवळ मानधन आणि काम करण्याच्या अटींवरून सुरू असलेला हा वाद आता थेट विश्वासघात आणि चित्रपटाची कथा लीक करण्याच्या गंभीर आरोपांपर्यंत पोहोचला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि चित्रपटाचे निर्माते यांच्यातील बिनसलेल्या संबंधांवर आता वांगा बंधूंनी मौन सोडले असून अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत.



१० टक्क्यांची नफा-भागीदारी आणि काम करण्याच्या अटी


या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत दीपिकासोबत तब्बल दीड वर्ष चर्चा सुरू होती. मात्र, तिने निर्मात्यांसमोर काही कडक अटी ठेवल्या होत्या. दिवसाला फक्त आठ तासांची शिफ्ट आणि वाढीव मानधनासोबतच तिने चित्रपटाच्या एकूण नफ्यात १० टक्के वाटा (Profit Share) मागितला होता. चित्रपटाचा एकूण आवाका आणि मोठे बजेट पाहता या मागण्या पूर्ण करणे निर्मात्यांसाठी निव्वळ अशक्य होते. ५ ते ६ कोटींच्या अतिरिक्त मानधनापेक्षा हा नफ्यातील वाटा खूप मोठा होता, ज्यामुळे निर्मात्यांनी अखेर माघार घेत इतर पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात केली.



गोपनीय कथा आणि पात्रांचे तपशील माध्यमांमध्ये लीक



निर्मात्यांच्या मते, खरा वाद मानधनाचा नसून गोपनीयतेचा भंग झाल्याचा आहे. जेव्हा टीमने दीपिकाऐवजी इतर अभिनेत्रींचा शोध सुरू केला, तेव्हा चित्रपटाची कथा आणि तिच्या व्यक्तिरेखेचे अंतर्गत तपशील अचानक प्रसारमाध्यमांमध्ये पसरू लागले. दीड वर्षाच्या काळात विश्वासाने सांगितलेली कथा अशा प्रकारे सार्वजनिक झाल्याने निर्माते प्रणय रेड्डी वांगा आणि संदीप रेड्डी वांगा प्रचंड संतापले. व्यावसायिकता बाजूला ठेवून केवळ सूडबुद्धीने ही माहिती बाहेर पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



सोशल मीडियावर संदीप वांगा यांचा थेट हल्ला आणि #DirtyPRGames


या संपूर्ण प्रकरणावर संदीप रेड्डी वांगा यांनी सोशल मीडियावर अत्यंत कडक शब्दांत आपली भूमिका मांडली. त्यांनी नाव न घेता लिहिले की, “दिग्दर्शक आणि कलाकारांमध्ये न बोलता एक गोपनीयतेचा करार (NDA) असतो, ज्याचा येथे थेट भंग झाला आहे.” एका नवोदित कलाकाराला कमी लेखणे आणि कथेची माहिती बाहेर पसरवणे यालाच 'फेमिनिझम' म्हणतात का, असा खोचक सवाल त्यांनी केला. स्वतःच्या वर्षांच्या मेहनतीचा असा अनादर झाल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराला 'डर्टी पीआर गेम' असे संबोधले आणि 'खुंदक में बिल्ली खंबा नोचे' या म्हणीचा संदर्भ देत आपला राग व्यक्त केला.



दीपिकाची एक्झिट अन् तृप्ती डिमरीची सरप्राईज एंट्री


या सर्व वादंगानंतर दीपिका पादुकोण या मोठ्या प्रोजेक्टमधून अधिकृतपणे बाहेर पडली आहे. चित्रपटाची कथा लीक होणे आणि अटींवरून झालेले मतभेद यांमुळे वांगा बंधूंनी कोणताही धोका न पत्करता मुख्य अभिनेत्री बदलण्याचा निर्णय घेतला. आता सर्व वाद शांत करत ‘स्पिरीट’ चित्रपटात दीपिकाच्या जागी अभिनेत्री तृप्ती डिमरी हिची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

शिक्षकांच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ इफ्फीमध्ये झळकला

काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर