Maharashtra Weather : राज्यातील हवामानात प्रचंड उलटफेर! आज तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार की ऊन पडणार? जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर कमी झाला असून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहेत, तर अनेक भागांत दमट आणि उष्ण हवामान जाणवत आहे. 21 ऑगस्ट रोजी राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. (Maharashtra Weather)


कोकण विभागातही पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. 21 ऑगस्ट रोजी कोणताही पावसाचा अलर्ट नसून काही भागांत हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकणात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. दमट हवामानासोबत काही काळ सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. (Weather Update)



पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मात्र, जोरदार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. घाटमाथ्यावरील भागातही पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. ( Weather News)


मराठवाड्यात गुरुवारी काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, 21 ऑगस्ट रोजी कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट नाही. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस नसल्याने या भागातील पावसाची तूट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुबार पेरणी आणि उभ्या पिकांच्या नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना आहे. (Marathwada Weather)


विदर्भातही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील काही दिवस बहुतांश भागात कोरडे, दमट आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. 


एकंदरीत, 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अलर्ट नाही. पुढील चार ते पाच दिवसही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे आणि पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (Marathwada Weather)


Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी