Jalgaon Crime : धनादेश बाउन्स...पाचोऱ्यात कापूस व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना गंडा, १.६३ कोटींची फसवणूक

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) तालुक्यात कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी ६३ लाख ४६ हजार ८१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कापूस खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना रोख रक्कम न देता धनादेश (Cheque) देण्यात आले. मात्र, हे धनादेश बँकेत जमा केल्यानंतर बाउन्स (Cheque Bounce) झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी हरिदास मोहनलाल ठक्कर, हर्ष ठक्कर आणि यश योगेश ठक्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यातील यश ठक्कर याला अटक करण्यात आली आहे. (Jalgaon Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


तारखेडा (Tarkheda) आणि परिसरातील २१ शेतकऱ्यांनी १५ मार्च रोजी संबंधित व्यापाऱ्यांना कापूस विकला होता. या कापसाची किंमत तब्बल १ कोटी २५ लाख ४६ हजार ८१० रुपये होती. कापूस घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना धनादेश दिले. मात्र, शेतकऱ्यांनी धनादेश बँकेत जमा केल्यानंतर संबंधित खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे समोर आले. काही धनादेशांच्या बाबतीत खाते बंद असल्याचेही बँकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे पैशांसाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, पैसे न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली. याच व्यापाऱ्यांनी पहाण येथील शेतकऱ्यांकडूनही कापूस खरेदी करून सुमारे ३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शेतकरी ज्ञानेश्वर भिका महाजन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी यश ठक्कर याला अटक केली.(Jalgaon Crime News)



पाचोरा पोलिसांकडून तपास सुरु


दरम्यान, शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केल्यानंतर त्याची रक्कम न देता त्या पैशातून सोने खरेदी केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. हे सोने पाचोरा येथील खासगी फायनान्समध्ये ठेवण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. हरिदास ठक्कर फरार होण्यापूर्वी त्याच्या नावावरील गोल्ड लोन यश ठक्करच्या नावावर हस्तांतरित केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून कापूस व्यवहारासोबतच बँक व्यवहार, धनादेश, सोन्याची खरेदी आणि गोल्ड लोनचीही चौकशी केली जात आहे. या फसवणुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, शेतकऱ्यांकडून घेतलेल्या पैशांचा नेमका वापर कुठे करण्यात आला आणि फरार संशयितांचा ठावठिकाणा काय, याचा तपास पाचोरा पोलीस (Pachora Police Station) करत आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण