CM Devendra Fadnavis : ‘सीएसआर’ निधीच्या वापरासाठी राज्यात स्थापन होणार ‘महा सीएसआर प्राधिकरण’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणार


मुंबई : महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. सीएसआर क्षेत्रातील विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबविले जात असल्याने त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत बैठक झाली. यावेळी त्यांनी सांगितले की, प्रस्तावित ‘महा सीएसआर प्राधिकरणा’मार्फत सीएसआर निधीचे समन्वयन, निरीक्षण आणि योग्य वापर सुनिश्चित करण्यावर भर देण्यात यावा. शासनाच्या प्राधान्यक्रमातील प्रकल्पांची दर्जेदार प्रकल्प बँक तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून द्यावी, सीएसआरसाठी पात्र ठरलेल्या लघु व मध्यम उद्योगांना योग्य प्रकल्प आणि स्वयंसेवी संस्था निवडण्यासाठी मार्गदर्शन करावे, तसेच राज्यातील उत्कृष्ट सीएसआर उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शासनाच्या प्राधान्याच्या प्रकल्पांना आवश्यक त्या ठिकाणी सीएसआर निधीच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचा यामागील उद्देश आहे.


‘सीएसआर’मधून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या देखभाल आणि दुरुस्तीवर विशेष भर देण्यात यावा. अनेकदा प्रकल्प उभारल्यानंतर त्याच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने काही वर्षांनी ते प्रकल्प निष्क्रिय होतात. ही स्थिती टाळण्यासाठी प्रस्तावित सीएसआर प्राधिकरणामार्फत जुन्या प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.


परदेशातील तसेच राज्याबाहेरील महाराष्ट्राशी संबंधित नागरिकांच्या सहभागातून सीएसआर व सामाजिक विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘डायस्पोरा कनेक्ट’ संकल्पनेचाही अभ्यास करण्याचीही सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतील तर गव्हर्निंग कौन्सिलमध्ये वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असेल. मुख्य कार्यकारी अधिकारी हे या गव्हर्निंग कौन्सिलचा सदस्य-सचिव तसेच कार्यकारी कौन्सिलचा प्रमुख असेल.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी