Maha Walkathon : महा वॉकेथॉनमधून जलसंपन्न महाराष्ट्राचा संदेश; राज्यभरात 3 लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक (Sudhakarrao Naik) यांच्या जलसंधारणाच्या कार्याची आठवण ठेवत 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून माती आणि पाण्याच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला. राज्यभरात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

मुंबईतील वरळी येथील सागर पॉईंटजवळ राज्यस्तरीय महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (Maha Walkathon,)

यावेळी बोलताना मंत्री संजय राठोड यांनी माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा, असा संदेश दिला. जलसंधारणासारख्या विषयावर केवळ बैठका न घेता थेट नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माती आणि पाणी हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ( Maharashtra Government)



माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचारातून जलसंधारणाच्या कामांना चालना दिली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत जलसंधारणाची लोकचळवळ मजबूत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी ‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम असल्याचे सांगितले. पाणी ही प्रत्येकाची गरज असून, जलसंधारणाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.  (Sachin Ahir)

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढवण्याची गरज व्यक्त केली. पावसाचे पाणी वाहून जाताना सुपीक मातीही वाहून जाते. त्यामुळे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि जमीन सुपीक ठेवण्यासाठी नागरिकांनी जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईतील राज्यस्तरीय वॉकेथॉनची सुरुवात आरे दुग्ध वसाहतीजवळील सागरी किनारा रस्त्यालगतच्या प्रोमेनेडपासून झाली. यावेळी सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जलपूजन आणि जलसंधारणाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर 3 किलोमीटरच्या वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.

अभिनेते पुष्कर श्रोत्री, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, गायक संजू राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मंत्री संजय राठोड यांच्यासह इतर मान्यवरांनीही संपूर्ण 3 किलोमीटर अंतर पायी चालून पूर्ण केले. ( Water Conservation Day)

 
Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.