Beed News : पुण्यात खळबळ! बीडचा नामांकित राष्ट्रीय खो-खो खेळाडूची आत्महत्या; POCSO गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीडचा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पॉक्सो (POSCO) कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. अटकेची भीती आणि जामीन मिळण्याबाबत निर्माण झालेल्या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.


तुकाराम करांडे याने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत दोन वेळा महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच तो बीड तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण देत होता. याच काळात एका अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  (Suicide News)



दरम्यान, सुमारे 15 दिवसांपूर्वी बीडमधील बार्शी रोड परिसरात अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तुकारामला अटक केली होती. या कारवाईत त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता. (Crime News)


त्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलीने तुकाराम आणि त्याच्या काही साथीदारांविरोधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, मुलीला ब्लॅकमेल करण्यात आले आणि एका कॅफेमध्ये पिस्तूलाचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (Beed News)


गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तुकाराम बीडमधून निघून पुण्यात गेला होता. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. 18 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी होणार होती. (Pune)


मात्र, त्याच्याविरोधात आधीच अवैध पिस्तूल प्रकरण दाखल असल्याने आणि पॉक्सोचा गंभीर गुन्हा नोंद झाल्याने तो मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Crime)


या घटनेनंतर पुणे आणि बीड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबी तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.


Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी