Rahul Gandhi : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी 'जेन-झी' इन्फ्लुएंसर्सना २५ हजारांची ऑफर?

- भाजपकडून व्हिडिओ पुरावा सादर; काँग्रेसचा 'फर्जीवाडा' उघड झाल्याचा दावा


मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्याविषयी सकारात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी 'जेन-झी' इन्फ्लुएंसर्सना २५ हजार रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रदीप भंडारी यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर जाहीर करत जोरदार निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi)


काँग्रेस पक्षाकडून तरुणांना, विशेषतः 'जेन-झी' पिढीला आकर्षित करण्यासाठी विविध संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, राहुल गांधी स्वतः यात मुख्य वक्ता म्हणून सहभागी होत आहेत. मात्र, पुणे येथील कार्यक्रमात आर्थिक मोबदला देऊन कृत्रिमरित्या गर्दी जमवली जात असल्याचा दावा भाजपने केला आहे. (Rahul Gandhi)


समोर आलेल्या कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिपमध्ये एका युवतीला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि राहुल गांधींच्या बाजूने प्रचार करणारे व्हिडिओ तयार करण्यासाठी २५ हजार रुपयांचे आमिष दाखवले जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असा दावा भंडारी यांनी केला आहे. पैशांचे आमिष दाखवून आणि पीआर एजन्सीच्या माध्यमातून सोशल मीडियावर खोटा माहोल तयार करून राहुल गांधींसाठी जनसमर्थन असल्याचे भासवण्याचा काँग्रेसचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा घणाघात भाजपने केला आहे. या प्रकारामुळे काँग्रेसचा खरा चेहरा आणि 'फर्जीवाडा' जनतेसमोर आल्याचा आरोप भंडारी यांनी केला आहे. (Rahul Gandhi)

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी