USA : अमेरिकेतून ५,२०० भारतीय हद्दपार

वॉशिग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली असून, याचा फटका भारतीय नागरिकांनाही बसत आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात अमेरिकेतून ५,२०० हून अधिक भारतीयांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बेकायदा स्थलांतरितांसोबत एच-१बी, ओ-१ आणि विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत गेलेल्या भारतीयांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते.


गेल्या वर्षी अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांची संख्या ३,५६७ होती. त्यापैकी सर्वजण बेकायदा मार्गाने अमेरिकेत दाखल झाल्याचे सांगण्यात आले होते. यंदा मात्र वैध व्हिसा असलेल्या काही व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांवरही कारवाई होत असल्याने चिंता वाढली आहे. (USA)


अमेरिकेतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. त्यामुळे अटक आणि हद्दपारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यंदा साधारण दर तीन आठवड्यांनी भारतीयांना घेऊन हद्दपारीचे विमान पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. जूनमध्ये ८०१ भारतीयांना हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीचा आदेश मिळाल्यानंतर लगेच देशाबाहेर पाठवले जातेच असे नाही. संबंधित व्यक्तीला न्यायालयात अपील करण्याची किंवा स्वेच्छेने अमेरिका सोडण्याची संधी मिळू शकते.


वाहतूक नियमांचे उल्लंघन, व्हिसाच्या अटींचे उल्लंघन किंवा सोशल मीडियावरील पोस्ट यांसारख्या कारणांवरूनही काही भारतीयांवर कारवाई झाल्याचे वृत्त आहे. काही विद्यार्थ्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. तसेच ट्रम्प प्रशासनावर सोशल मीडियावर टीका करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाही इमिग्रेशन कारवाईला सामोरे जावे लागल्याचे सांगण्यात आले आहे.टेक्सासमधील एच-१बी व्हिसाधारक भारतीयाचे नोकरी गेल्यानंतरच्या काळातील प्रकरणही चर्चेत आले आहे. त्याला नवीन नोकरी शोधण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी मिळाला होता. या काळात तो अर्धवेळ काम करत असताना एका रेस्टॉरंटवरील इमिग्रेशन कारवाईत अटक करण्यात आली. त्याच्यावर व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून भारतात हद्दपार करण्यात आल्याचे वृत्त आहे. (USA)


दरम्यान, कॅनडातील अल्बर्टा प्रांतात सुमारे १,५०० भारतीय विद्यार्थ्यांवर हद्दपारीचे संकट निर्माण झाले आहे. वर्क परमिटशी संबंधित बदलांमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. वैध व्हिसा किंवा वर्क परमिट नसलेल्या परदेशी नागरिकांनी देश सोडावा, अशी कॅनडाची भूमिका आहे.


अमेरिकेत यंदा हद्दपारीसाठी नागरी विमानांचा वापर होत आहे. भारतीयांना टेक्सासहून ओमान एअरच्या विमानाने सुमारे २० तासांच्या प्रवासानंतर नवी दिल्लीला पाठवले जात असल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी काही हद्दपारीसाठी लष्करी विमानांचा वापर करण्यात आला होता. (USA)

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे