Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सध्याची ‘MH 12 ZZ’ ही मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे नवीन वाहनांची नोंदणी सुरू ठेवण्यासाठी पुणे आरटीओकडून ‘MH 61’ ही नवी मालिका सुरू करण्याची तयारी केली जात आहे. (Pune News)



‘MH 12’ नंतर तीन अक्षरी मालिका का नाही?


सध्या पुणे आरटीओमध्ये दुचाकींसाठी ‘MH 12 ZZ’ ही मालिका सुरू आहे. दोन अक्षरांची ही मालिका संपल्यानंतर ‘MH 12 AAA’ अशी तीन अक्षरी मालिका सुरू करण्याचा पर्याय आहे. मात्र, अशा प्रकारच्या तीन अक्षरी मालिकेसाठी सध्याच्या मोटार वाहन नोंदणी व्यवस्थेत कायदेशीर तरतूद नसल्याचे सांगण्यात येत आहे. (Pune RTO)


याशिवाय तीन अक्षरी क्रमांकामुळे नंबरप्लेटची लांबी वाढणार असून, रस्त्यांवरील सीसीटीव्ही आणि ऑटोमॅटिक नंबरप्लेट रेकग्निशन कॅमेऱ्यांना हे क्रमांक अचूकपणे वाचण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पर्याय पुढे नेता आला नाही. (Pune Vehicle Registration)



‘MH 12 1A’चा प्रस्तावही प्रलंबित


पुणेकरांची ‘MH 12’ ही ओळख कायम राहावी यासाठी ‘MH 12 1A’ असा पर्याय आरटीओकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा केला. मात्र, या पर्यायात तांत्रिक अडचणी असल्याने तातडीने निर्णय होण्याची शक्यता कमी आहे.


त्यामुळे नवीन वाहनांच्या नोंदणीवर परिणाम होऊ नये म्हणून पुणे आरटीओला तात्पुरत्या स्वरूपात ‘MH 61’ ही नवी मालिका देण्याची तयारी सुरू आहे. (Maharashtra RTO)



पुण्यात 44 लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी


पुणे आरटीओमध्ये जुलै 2026 पर्यंत 44 लाख 71 हजारांहून अधिक वाहनांचीनोंद झाली आहे. वाहनांची संख्या वेगाने वाढत असल्याने उपलब्ध क्रमांक मालिका झपाट्याने संपत आहेत. दरम्यान, भविष्यात ‘MH 12 1A’च्या तांत्रिक अडचणी दूर झाल्यास हा पर्यायही लागू केला जाऊ शकतो. त्यानंतर वाहनधारकांना ‘MH 12’ आणि ‘MH 61’ यापैकी क्रमांक मालिका निवडण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम अधिकृत निर्णय झालेला नाही. ( Pune RTO Series)

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा