BJP Gen Z Campaign : भाजपकडून 'जेन झी' जोडणी मोहिमेसाठी विशेष पथक स्थापन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने देशभरातील युवा पिढीशी (जेन झी) संवाद अधिक घट्ट करण्यासाठी आणि त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे. पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेसाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि विनोद तावडे, गुजरातचे मंत्री हर्ष संघवी, छत्तीसगडचे मंत्री ओ. पी. चौधरी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. तरुण पिढीशी थेट आणि सातत्यपूर्ण संवाद साधण्याच्या उद्देशाने भाजप लवकरच ही मोहीम सुरू करणार आहे. (BJP Gen Z Campaign)



भाजपच्या कार्यक्रमाचा मुख्य भर 'जेन झी'च्या आकांक्षा, त्यांच्यासमोरील समस्या आणि अपेक्षा समजून घेण्यावर असेल. तसेच तरुणांना भाजप नेत्यांशी थेट संवाद साधून आपले विचार मांडण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला जाईल. या पथकात विविध संघटनात्मक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या पिढीपर्यंत पोहोचताना संघटनात्मक अनुभव आणि तरुण नेतृत्वाची सांगड घालण्यावर भाजपने भर दिला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध चर्चासत्रे, परस्परसंवाद आणि इतर उपक्रमांद्वारे तरुण मतदारांशी संपर्क वाढवला जाईल. मोहिमेचे वेळापत्रक आणि स्वरूप लवकरच जाहीर केले जाईल. (BJP Gen Z Campaign)


या घोषणेपूर्वी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची पहिली ओळख बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'ची सहाही कडवी गायली गेली. नव्या राष्ट्रीय पथकात विनोद तावडे आणि सुनील बन्सल राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळतील. तर बिप्लब कुमार देव, स्मृती इराणी, सतीश पुनिया, गजेंद्र पटेल, हरिष द्विवेदी आणि संजय भाटिया यांची नवीन राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे, तर राजस्थानचे राजेश मंगल यांची राष्ट्रीय सह-कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (BJP Gen Z Campaign)

Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, या

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये