Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंसह ६ जणांवर लातुरात गुन्हा नोंदवला

लातूर : कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपकेंसह सहा जणांवर औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद प्रशाला विभाग उर्दू, औसा येथील शाळेत अनधिकृत प्रवेश करुन विद्यार्थ्यांमध्ये बसत चित्रीकरण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत दिपकेंसह अजिंक्य शिंदे आणि अन्य चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



२० ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास अभिजीत दिपके अन्य काही जणांसह शाळेत गेले होते. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून विविध प्रश्न विचारत शिक्षकांच्या शैक्षणिक आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच शाळेची परवानगी न घेता चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळेतील विद्यार्थी असतानाही दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी आणून बसवले असल्याचे सांगत दिपकेंनी शाळेची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी शिक्षकांना अपशब्द वापरुन, त्यांना निलंबित करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सय्यद समशादबानो खैरातअली यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून चित्रीकरण, शाळेत प्रवेश करण्याची परिस्थिती तसेच संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत पुढील तपास केला जात आहे.



दरम्यान, राजस्थानमधील जयपूर येथील रामपुरा कंवरापुरा गावात शुक्रवारी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. 'स्कूल ठीक करो' (शाळा नीट करा) या मोहिमेअंतर्गत हे पथक स्थानिक सरकारी शाळेतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते. या पाहणीदरम्यान गावकऱ्यांनी आणि काही अज्ञात व्यक्तींनी या तपासणीला तीव्र विरोध करत पथकावर हल्ला चढवला. सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेची पाहणी करत असताना पथकातील सदस्यांना मारहाण करण्यात आली आणि महिला सदस्यांशी अत्यंत गैरवर्तन करण्यात आले. या घटनेदरम्यान पोलीस तेथे हजर असूनही त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप पक्षाने केला आहे. या संपूर्ण हल्ल्यामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप सीजेपीने केला आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

Thane Fire News : ठाणे हादरले! दिवा-शिल रोडवरील व्यावसायिक संकुलात भीषण आग; चार गोदामे जळून खाक, मोठी जीवितहानी टळली

ठाणे : ठाण्यातील दिवा-शिल रोड परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि खळबळजनक आगीची घटना घडली. एका

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून