National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.



महाराष्ट्रातील चार मानकरी


डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे - बीड : दिव्यांग, ऊसतोड कामगारांची मुले आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन आणि शैक्षणिक अडचणींवर मात करण्यावर भर.


कुंदा जयवंत बच्छाव - नाशिक : नाशिक मनपा शाळा क्रमांक १८चा दर्जा सुधारण्यासाठी ‘ज्ञानभिंती’, ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ आणि अमेरिकेतील शाळांशी ‘ई-ट्विनिंग’सारखे अभिनव उपक्रम.


वैभव वसंतराव कुलकर्णी - लातूर : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर. विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी केली.


शिवप्रसाद अरविंद टिंगरे - सातारा : विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजवण्यासाठी योगदान. NDA व विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.



तीन टप्प्यांत निवड


पुरस्कारासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया झाली. १५ जून ते २० जुलैदरम्यान ऑनलाइन स्व-नामांकन मागवण्यात आले. नावीन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची प्रगती, व्यक्तिमत्त्व विकास आणि शाळेच्या गुणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न या निकषांवर अंतिम ४८ शिक्षकांची निवड करण्यात आली.



५ सप्टेंबरला पुरस्कार सोहळा


शिक्षक दिनानिमित्त विज्ञान भवनात होणाऱ्या समारंभात पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कार्यावर आधारित लघुपटही यावेळी दाखवले जाणार असून कार्यक्रमाचे विविध माध्यमांवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी