Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक


डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत



छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळ असलेल्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट रोजी एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली. एका नवीन मोबाईलच्या हट्टापायी एकाच कुटुंबातील तीन जणांचा अंत झाला आहे. मृतांमध्ये १९ वर्षीय कुणाल चांदगुडे, त्याचे ४८ वर्षांचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.


आयफोनचा हट्ट अन् एकाच घरातील तीन बळी



प्राथमिक माहितीनुसार, कुणालला ॲपल कंपनीचा आयफोन १५ मोबाईल हवा होता. यावरून त्याचे आई-वडिलांसोबत वाद झाले होते. याच वादातून रागाच्या भरात कुणाल सकाळी १० वाजेच्या सुमारास खवड्या डोंगरावर पोहोचला आणि टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत कड्यावर उभा राहिला. मुलगा डोंगरावर गेल्याचे समजताच त्याला वाचवण्यासाठी आणि त्याची समजूत काढण्यासाठी आई-वडील तात्काळ तेथे पोहोचले.




कुणालला वाचवण्याचा प्रयत्न सुरु होताच



कुणालला खाली उतरवण्यासाठी सुमारे तीन तास प्रयत्न सुरू होते. पोलीस, स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि गावातील सरपंच सर्वांनीच त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी त्याला आईकडे बघून असा निर्णय न घेण्याची विनंती केली. सरपंचांनी तर त्याला स्वतःचा मोबाईल देऊन आयफोन १५ प्रो घेऊन देण्याचे आश्वासनही दिले. त्याला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न झाला, परंतु कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता.



तिघांच्या आत्महत्या कॅमेऱ्यात कैद



अखेर कुणालने डोंगराच्या कड्यावरून खाली उडी मारली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल सुटला आणि तेही खाली कोसळले. मुलगा आणि पती डोळ्यांदेखत खाली पडल्याचे पाहून अत्यंत दुःखात आईनेही खाली उडी घेतली. या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. एका किरकोळ वादातून संपूर्ण कुटुंब संपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा