Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे. आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणात तीन मुलींचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची राज्याच्या आदिवासी विकास विभागाने गंभीर दखल घेतली आणि दोघांना सेवेतून निलंबित केले. जपतलाई येथील खासगी अनुदानित आश्रम शाळेची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी ज्यांच्यावर होती, ते सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी. पी. सादमवार आणि तत्कालीन प्रभारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. कन्नाके या दोघांवरही निलंबनाची कारवाई झाली आहे.



संपूर्ण आश्रम शाळेची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी असलेल्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) पी. पी. सादमवार यांनी १० फेब्रुवारी आणि १ एप्रिल २०२६ रोजी शाळेला भेटी दिल्या होत्या. या कृतीतून त्यांनी सोपस्कार पूर्ण केला. पण शाळेतील व्यवस्थेत आढळलेल्या त्रुटींकडे दुर्लक्ष केले. शौचालय आणि बाथरूम अस्वच्छ होते. ​मुलींच्या वसतिगृहाजवळ कचरा आणि लाकडाचे तुकडे पडलेले होते. यामुळे सापाचा धोका वाढला. गंभीर बाब म्हणजे शाळेत प्रथमोपचार पेटी नव्हती. या गंभीर त्रुटींकडे सादमवार यांनी दुर्लक्ष केले. यामुळे सर्पदंशामुळे तीन मुलींचा हकनाक बळी गेला. याच कारणामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार अपर आयुक्त आयुशी सिंह यांनी सादमवार यांना निलंबित केलं आहे. सादमवार यांच्यासोबत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कन्नाके यांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे . निलंबन काळात त्यांचे मुख्यालय भामरागड येथे असेल.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने