Nashik Crime News : बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

Nashik Crime News : नाशिकच्या शरणपूर रोडवरील न्यू पंडित कॉलनीत मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. ‘अरिहंत’ बंगल्यात कुटुंबीय गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्याने किचनच्या पॅसेजमधील लोखंडी ग्रिलवरून उडी मारत घरात प्रवेश केला. त्यानंतर किचनची काचेची खिडकी उघडून ट्रॉलीच्या ड्रॉवरमधील तब्बल २ लाख ३७ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारला.(Nashik Crime News)



नेमकी घटना काय ?


१४ जुलैच्या रात्री ११ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास न्यू पंडित कॉलनीतील (New Pandit Colony) 'अरिहंत’ बंगल्यात ही घटना घडली. बांधकाम व्यावसायिक करण राजेंद्र शाह हे कुटुंबासह घरात झोपलेले असताना चोरट्याने संधी साधली. किचनमधून प्रवेश केल्यानंतर त्याने शिताफीने चांदीच्या वस्तू लंपास केल्या आणि पसार झाला. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे ७ किलो ९०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये ५ किलो वजनाचा डिनर सेट, दोन किलो वजनाचे दोन चांदीचे जग तसेच बाऊल, वाट्या, चमचे, डिश, काटे आणि ग्लास अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. (Nashik Crime News)



सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


या प्रकरणी करण शाह यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, गजबजलेल्या आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शरणपूर रोड परिसरातील बंगल्यातच मध्यरात्री चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे .(Nashik Crime News)



​चोरीला गेलेल्या चांदीच्या वस्तू


५ किलो वजनाचा डिनर सेट, यात १ ताट, १ ग्लास, १ डिश, १ वाटी, १ चमचाचा समावेश आहे ज्याची किंमत रु. १,५०,००० आहे तर साठ हजारांचे ​२ किलो वजनाचे दोन जग २५० ग्रॅमचा बाऊल, वाटी, चमचे, डिश, काटा चमचा आणि चांदीचे ग्लास असा एकूण १५० ते २५० ग्रॅम वजनाचा ऐवज चोरट्याने पळवला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून (Sarkarwada Police Station) आधी तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर