Nashik KumbhMela : सिंहस्थासाठी आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’, औषधसाठा, रुग्णवाहिकेसह आवश्यक उपाययोजना करा - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Nashik KumbhMela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना अत्याधुनिक आणि तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने सज्ज राहावे. आवश्यक यंत्रसामग्री, औषधसाठा, रुग्णवाहिका आणि मनुष्यबळाचे नियोजन वेळेत पूर्ण करून डिसेंबरपर्यंत रुग्णालये कार्यान्वित करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Minister Prakash Abitkar) यांनी दिले.



आवश्यक यंत्रसामग्री, औषधसाठ्याचे नियोजन करा


नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Nashik Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी दुपारी कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी मंत्री आबिटकर बोलत होते. यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले की, कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आरोग्य सुविधांचे नियोजन अधिक सक्षमपणे करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि औषधसाठ्याचे आतापासूनच नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रलंबित शासकीय रुग्णालयांची कामे मोहीम स्तरावर पूर्ण करून येत्या डिसेंबरपर्यंत ती कार्यान्वित करावीत व त्यांचे लोकार्पण करावे. कुंभमेळ्याच्या कालावधीत आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी जिल्ह्यात रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येईल. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठीही सहकार्य करण्यात येईल. वैद्यकीय क्षेत्रातील संस्था आणि संघटनांचे सहकार्य घेऊन त्यांच्याशी प्रभावी समन्वय साधावा, असे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांनी महामार्गावरील अपघात आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. आरोग्य उपसंचालक डॉ. आहेर (Deputy Director of Health Dr. Aher) यांनी आरोग्य विभागाने कुंभमेळ्यासाठी केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली.



यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी