Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League) दमदार कामगिरी करत यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रो नोंदवला. नीरजने ८८.०५ मीटर भालाफेक करत दुसरे स्थान मिळवले. मात्र, अवघ्या ९ सेंटीमीटरच्या फरकामुळे त्याला सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले.


श्रीलंकेचा रुमेश तरंगा पथिरागे याने ८८.१४ मीटरचा थ्रो करत पहिला क्रमांक पटकावला. तर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स ८६.६९ मीटरच्या थ्रोसह तिसऱ्या स्थानावर राहिला.



दुसऱ्या प्रयत्नात नीरजची जबरदस्त झेप :


नीरजने (Neeraj Chopra) स्पर्धेची सुरुवात ८३.५४ मीटरच्या थ्रोने केली. त्यानंतर त्याने ८३.७२ मीटरची कामगिरी नोंदवली. दुसऱ्या फेरीत नीरजने थेट ८८.०५ मीटरचा थ्रो करत आघाडी घेतली. त्यामुळे काही काळ तो अव्वल स्थानावर होता. मात्र, अखेरच्या फेरीत पथिरागेने ८८.१४ मीटरचा शानदार थ्रो करत नीरजला मागे टाकले. त्याने ही आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत सुवर्णपदकावर नाव कोरले. (Lausanne Diamond League)



डायमंड लीग फायनलच्या शर्यतीत नीरज मजबूत :


लुसाने डायमंड लीगमधील नीरजचे (Neeraj Chopra) दुसरे स्थान त्याच्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. या स्पर्धेपूर्वी नीरजच्या खात्यात केवळ पाच गुण होते आणि तो हंगामातील गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता. डायमंड लीग फायनलसाठी भालाफेकमधील अव्वल सहा खेळाडूंना थेट पात्रता मिळते. त्यामुळे लुसानेमध्ये मिळवलेले गुण नीरजसाठी फायदेशीर ठरणार आहेत. ज्यूरिखमध्ये होणाऱ्या अंतिम पात्रता स्पर्धेपूर्वी नीरजने फायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. (Lausanne Diamond League)

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात