Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर आता त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.


टीझरमध्ये "कोणाच्या डोक्यावर बॉम्ब लागणार...?" असा मजकूर पाहायला मिळत असून, यामुळे चित्रपटाच्या कथेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा करण्यात आलेल्या या चित्रपटात काही वास्तवातील व्यक्तिरेखांवर आधारित पात्रेही पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.



दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत


अभिनेत्री दीपाली सय्यद चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून, अभिनेते उदय टिकेकर यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे. टीझरमधील दीपाली सय्यद यांचा लूक लक्षवेधी ठरत आहे.


'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'ची निर्मिती आनंदी पिक्चर्स अमरावती, सचिन रोरे पाटील, फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे हे निर्माते आहेत, तर स्वरूप बी. सावंत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.


चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. आकाश काकडे सिनेमॅटोग्राफी, तर अक्षय आंबेकर कला दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत.





2 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार


'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नेमकी कोणती कथा आणि कोणते पैलू चित्रपटातून मांडले जाणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’