Eknath Shinde : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी ‘मिशन मोड’वर काम करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण विभागाने ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शनिवारी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या तब्बल चार तासांच्या बैठकीत त्यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला.


या बैठकीत शिक्षण विभागाच्या विविध योजना, उपक्रम आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती अधिकाऱ्यांनी सादर केली. विभागाकडून सुरू असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करताना, हे उपक्रम राज्यातील प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक वेगाने काम करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.



शाळांच्या आधुनिकीकरणासाठी कालबद्ध कृती आराखडा :


राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत दृश्यमान बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Eknath Shinde)



“आजच्या विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि स्वप्ने बदलत आहेत. त्यानुसार आपल्या शाळाही बदलल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तयार करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था निर्माण केली पाहिजे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या कृती आराखड्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचा सहभाग वाढवण्यासोबतच शिक्षकांसाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन आणि योग्य सन्मान देण्याची सूचनाही करण्यात आली. (Eknath Shinde)



विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी :


शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम आणि परीक्षा नसून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास हा शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पोषण, मध्यान्ह भोजन योजना तसेच मानसिक आरोग्य आणि भावनिक स्वास्थ्याशी संबंधित उपक्रमांना अधिक महत्त्व देण्याच्या सूचना देण्यात आल्या. (Eknath Shinde)



पालक आणि समाजाचा सहभाग वाढवणार :


शाळांच्या विकासामध्ये पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक समाजाची सक्रिय भागीदारी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या चांगल्या उपक्रमांची आणि त्यातून होणाऱ्या सकारात्मक बदलांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देशही देण्यात आले. (Eknath Shinde)



आमदार-खासदारांना शाळा दत्तक घेण्याचे आवाहन :


आपल्या मतदारसंघातील शाळांच्या विकासासाठी आमदार आणि खासदारांनी शाळा दत्तक घ्याव्यात, तसेच उपलब्ध निधी आणि स्थानिक संसाधनांच्या माध्यमातून शाळांच्या विकासात योगदान द्यावे, यासाठी त्यांना आवाहन करण्यात येणार आहे. (Eknath Shinde)



शाळांच्या विकासासाठी कॉर्पोरेट क्षेत्राचे सहकार्य :


शाळांच्या आधुनिकीकरणासाठी उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्राची व्यावसायिक क्षमता वापरण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तंत्रज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, कौशल्यविकास, संसाधने आणि इतर आवश्यक सहकार्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि उद्योगक्षेत्रातील प्रमुखांसोबत बैठका घेण्यात येणार आहेत.



केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी :


केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची महाराष्ट्रात प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. योजनांचा प्रत्यक्ष लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे की नाही, यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. (Eknath Shinde)



दर आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा :


शिक्षण क्षेत्रातील प्रस्तावित कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. कामातील अडथळे दूर करून विविध उपक्रमांना गती देण्यासाठी या आढावा बैठकीत आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत. “शाळा बदलल्या तर विद्यार्थ्यांचे भविष्य बदलेल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य बदलले तर महाराष्ट्राचे भविष्य बदलेल. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक चांगला उपक्रम मिशन मोडवर पुढे नेऊन त्याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. (Eknath Shinde)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने