Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल त्यासोबत स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये चर्चा करून चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी दिली. रेशीमबाग मैदानावर मंथन फॉर युवा या उपक्रमांतर्गत ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन असलेल्या व्यक्तींसोबत थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र व देश यासाठी युवकांना शपथ आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 25 हजार पेक्षा जास्त युवक व युवती सहभागी झाल्या होत्या.


महाराष्ट्राची परंपरा असलेल्या ढोल ताशा पथकाने इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या मध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे. आधार नोंद असलेल्या 585 ध्वजधारकांच्या या उपक्रमामुळे जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविक्रम केल्याबद्दल संपूर्ण चमुचे अभिनंदन केले. 25 हजार पेक्षा जास्त युवकांच्या साक्षीने हा उपक्रम पूर्ण झाला असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजची युवा पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या कौशल्याने नावलौकिक मिळवित आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक सहभाग लाभलेल्या ध्वजधारकांच्या समावेशाबद्दल विश्वविक्रमामध्ये नोंद झाली असून यापूर्वी 260 ध्वज धारकांचा समावेश असलेला विक्रम आज मोडीत निघाला आहे. सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक रिधिमा पाठक यांनी युवकांचे आयकॉन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच क्रिकेटपटू तिलक वर्मा, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेते दिलीप महादू गावित, अर्जुन देशपांडे, किरण शहाजी यांचे सोबत संवाद साधताना विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रेरणा व अनुभव युवकांसमोर शेअर केले.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की संविधानामुळेच लोकशाही प्रगल्भ झाली आहे. आपल्या लोकशाहीमुळेच मला नगरसेवक, महापौर, आमदार आणि मुख्यमंत्री या पदापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. आपल्या आकांक्षा व विश्वास पूर्ण करण्यासाठी संविधानामुळेच कुणीही थांबू शकत नाही असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय व सामाजिक वाटचालीची माहिती युवकांसमोर मांडली. स्टार्टअप संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युवकांना शासनाची संपूर्ण मदत करण्याचे धोरण असून स्टार्टअपसाठी इकोसिस्टीम पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या धोरणामध्ये युवकांना शंभर टक्के मदत करण्याचा उद्देश असल्याने युवकांसोबत चर्चा करून आणखी चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल असा विश्वास यावेळी त्यांनी दिला. मुलांमध्ये असलेल्या सर्वाधिक स्क्रीन टाईम बद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे. स्क्रीनवरून मैदानावर कसे वळता येईल याबद्दलही या क्षेत्रातील तज्ञांकडून निश्चित धोरण ठरविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.


प्रारंभी मंथन फॉर युवाचे आयोजक रितेश गावंडे यांनी स्वागत करून या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. 1 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंत या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन म्हणून ओळख असलेल्या युवक व युवतींचा गौरव करून त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती देण्यात आली. नशा मुक्त भारत या अंतर्गत युवकांना नशा मुक्तीची शपथ देण्यात आली. यामध्ये अमली पदार्थ मुक्त जीवनशैली, व्यसनापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा त्यासोबतच अमली पदार्थांचा वापर अथवा विक्री कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. तसेच आपली अमली पदार्थ मुक्त युवा पिढी घडविण्यासाठी सक्रिय सहभाग याबद्दल युवकांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शपथ दिली.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी