Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुसरा श्रावणी सोमवार असल्याने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.



उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या देखरेखीखाली मंदिर व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तब्बल २७८ पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, आरसीपी आणि एसआरपीएफ जवानांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे.



श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन, दर्शन रांगा, वाहतूक व्यवस्था तसेच भाविकांच्या सुरक्षिततेवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी