Nalasopara Viral Video : नालासोपाऱ्यात हॉटेलच्या भातावर उंदरांचा हैदोस; ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेलवर कठोर कारवाईची मागणी

नालासोपारा : वसई-विरार महापालिका (Vasai-Virar Mahanagpalika) क्षेत्रातील नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातून एक अत्यंत किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना वाढण्यासाठी ठेवलेल्या भाताच्या पातेल्यावर चक्क उंदीर फिरताना आणि ताव मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नालासोपाऱ्यातील हॉटेल्समधील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल




व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हॉटेलच्या काउंटरवर किंवा सर्व्हिस टेबलवर उघड्यावर ठेवलेल्या भातावर उंदीर फिरत आहे. हॉटेल चालकांचा हा बेफिकीरपणा ग्राहकांच्या थेट आरोग्याशी खेळणारा आहे. हा व्हिडिओ ग्राहकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर टाकताच, नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.



अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह



हॉटेलमध्ये अन्नपदार्थ सुरक्षित आणि झाकून ठेवणे बंधनकारक असताना, असा निष्काळजीपणा कसा केला जातो? असा सवाल नागरिक विचारत आहेत. अन्नपदार्थांवर उंदीर किंवा घुशी फिरल्याने 'लेप्टोस्पायरोसिस' आणि अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे वसई-विरार पालिका आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) केवळ हप्तेवसुलीत मग्न आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक रहिवासी विचारत आहेत.



कठोर कारवाईची मागणी


या किळसवाण्या प्रकारानंतर संबंधित हॉटेलवर तात्काळ सील ठोकून मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच परिसरातील इतर हॉटेल्सचीही अन्न सुरक्षानिबंधकांमार्फत तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता प्रशासन या बेजबाबदार हॉटेल मालकावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने