Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 30 हजारांहून अधिक पोलिसांच्या निवासाचे नियोजन, पोलिसांच्या निवासाची व्यवस्था कार्यक्षेत्राजवळ करण्यावर भर

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात तब्बल १२ कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज असून, त्यांच्या सोयीसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. तर मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या असल्याने पोलीस बंदोबस्त देखील मोठा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवास व्यवस्थेचे नियोजन अंतिम टप्प्यात आणले आहे. विविध शासकीय कार्यालये, पोलिस आस्थापना, धर्मशाळा, ट्रस्टच्या इमारती तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये मिळून ३० हजार ३४० जणांच्या निवासाची क्षमता उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये ३ हजार २२८ अधिकारी-कर्मचारी, तर तब्बल २७ हजार ११२ अंमलदार व इतरांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. ( Simhastha Kumbh Mela)



30 हजारांहून अधिक पोलिसांच्या निवासाचे नियोजन


मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या असल्याने आणि कायदा सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त लागणार आहे. त्यामुळे सिंहस्थ काळात मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती होणार आहे त्यामुळे त्यांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मंगल कार्यालये, लॉज आणि धर्मशाळांमध्ये सर्वाधिक २१ हजार ६१४ जणांची निवास क्षमता उपलब्ध आहे. त्यापाठोपाठ नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या बॅरेकमध्ये २ हजार ३००, पोलिस मुख्यालयातील २४ बॅरेकमध्ये १ हजार ९२८, तर पोलिस ठाणे व शाखा रोड क्रमांक ५ येथे ६७८ जणांची व्यवस्था प्रस्तावित आहे. पांजरापोळ ट्रस्टच्या इमारतींमध्ये ५०० जणांची, तर इतर आवश्यक बांधकाम व दुरुस्तीच्या माध्यमातून ९२ जणांची निवास क्षमता उपलब्ध होणार आहे. इंद्रकुंड येथील मनपा इमारतीत अधिकारी वर्गासाठी ५०, आरोग्य विज्ञान विद्यापीठात ५०, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात १२०, महाराष्ट्र पोलिस अकादमीत १ हजार १४२, तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या डीटीएस इमारतीमध्ये २०० अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. (Simhastha Kumbh Mela)



पोलिसांच्या निवासाची व्यवस्था कार्यक्षेत्राजवळ करण्यावर भर


गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा, मिरवणुका व स्नानपर्व काळात बंदोबस्त यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे अधिकारी व अंमलदारांच्या निवासाची व्यवस्था त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ करण्यावर भर देण्यात येत आहे. निवासाची व्यवस्था योग्य झाल्यास, बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिसांना वेळेत संबंधित ठिकाणी पोहोचणे शक्य होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणेही सुलभ होणार आहे. गर्दीच्या ठिकाणी संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालणे, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, संवेदनशील भागात गस्त वाढविणे, यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करता येणार आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.