Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने राज्यातील काही भागांत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील 24 तासांत काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.


कोकण विभागात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये विशेष अलर्ट नसला तरी काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस या भागात दमट आणि उष्ण हवामान राहण्याचा अंदाज आहे.



उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी सध्या विशेष इशारा देण्यात आलेला नाही. अनेक भागांत अद्याप पावसाची तूट असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.


पश्चिम महाराष्ट्रात पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून, येथे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.


मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे.


दरम्यान, विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असून, पुढील एक ते दोन दिवस काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहू शकतो.


एकंदरीत, राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून, पुढील दोन ते तीन दिवस काही भागांत पावसाच्या सरी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांनुसार नियोजन करावे.

Comments
Add Comment

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी