Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय


मुंबई : “खरीप २०२५ मध्ये जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पाऊस, सरासरीपेक्षा अधिक पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांसाठी ८६ कोटी ६५ लाख २९ हजार रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.



नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पात्र शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या निकष व दरानुसार ही मदत देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणून हा निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.पात्र लाभार्थ्यांची माहिती निश्चित करून डीबीटी प्रणालीद्वारे मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मदत वाटपाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे निर्देश संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याच हंगामात यापूर्वी वितरित झालेल्या मदतीची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.



मंत्रिमंडळ उपसमितीच्या २ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हा निधी विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नाशिक विभागातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त पात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, पुढील शेती हंगामासाठी त्यांना आर्थिक आधार उपलब्ध होणार आहे.पात्र शेतकऱ्यांना ही मदत डीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. मदत वाटपाची प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचेही मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.याबाबतचा मदत व पुनर्वसन विभागाने शासननिर्णय नुकताच प्रसिध्द केलेला आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म