Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दृश्यम' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाचे चित्रीकरण सुरू झाले असून, या चित्रपटाचे नाव 'दृश्यम: द कन्क्लुजन' असे ठेवण्यात आले आहे. (Ajay Devgan)


चित्रपटाचे पहिले पोस्टरही समोर आले आहे. अजय देवगणच्या पोस्टरवर 'माझे सत्य, माझा हक्क, फक्त माझे कुटुंब' अशी टॅगलाइन पाहायला मिळते. त्यामुळे विजय साळगावकर पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणती चाल खेळणार, याची उत्सुकता वाढली आहे. (Drishyam 3 The Conclusion)




तब्बू, श्रिया सरन आणि रजत कपूरही परतणार


'दृश्यम'च्या तिसऱ्या भागात मागील चित्रपटातील अनेक कलाकार पुन्हा आपल्या भूमिकेत दिसणार आहेत. तब्बू पुन्हा मीरा देशमुखच्या भूमिकेत, तर श्रिया सरन नंदिनी साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. रजत कपूरही महेश देशमुखची भूमिका साकारणार आहे.


दरम्यान, चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये जयदीप अहलावतची एन्ट्री झाली आहे. यापूर्वी अक्षय खन्ना पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता ही भूमिका जयदीप अहलावत साकारणार असल्याचे समोर आले आहे. प्रकाश राज यांचाही चित्रपटात समावेश आहे. ( Bollywood Update)



'दृश्यम 2'नंतरची कथा पुढे जाणार


'दृश्यम: द कन्क्लुजन'ची कथा 'दृश्यम 2'नंतर पुढे जाणार आहे. विजयने आपल्या चातुर्याने कुटुंबाला संकटातून वाचवले असले, तरी त्याच्यावरील संशय पूर्णपणे संपलेला नव्हता. आता नव्या भागात साळगावकर कुटुंबासमोर कोणते संकट उभे राहणार आणि विजय पुन्हा एकदा पोलिसांना चकवा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Drishyam 3 Announcement)


या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार आहेत. पटकथा अभिषेक पाठक, आमिल कियान खान आणि परवेझ शेख यांनी लिहिली आहे.


'दृश्यम: द कन्क्लुजन' 2 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विजय साळगावकरच्या कथेला अखेरचा ट्विस्ट काय मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. ( Entertainment News)

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’