INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे दाखल झाली आहे. किनारपट्टीजवळील उथळ समुद्रात पाणबुड्यांचा शोध घेणे, त्यांचा माग काढणे आणि संभाव्य पाण्याखालील धोके निष्प्रभ करण्यासाठी ही युद्धनौका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. (INS Mangrol)



कोचिन शिपयार्डने केली निर्मिती :


भारतीय नौदलासाठी कोचिन शिपयार्डकडून तयार करण्यात येत असलेल्या आठ Anti-Submarine Warfare Shallow Water Craft (ASW-SWC) युद्धनौकांच्या मालिकेतील ‘मंगरोल’ ही तिसरी नौका आहे. याआधी ‘माहे’ आणि ‘मालवण’ या दोन नौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या युद्धनौकेत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी उपकरणांचा वापर करण्यात आल्याने ‘आत्मनिर्भर भारत’ आणि संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरणाच्या दृष्टीनेही ही नौका महत्त्वाची मानली जात आहे. (INS Mangrol)



उथळ पाण्यात पाणबुड्यांचा शोध घेणार :


किनारपट्टीजवळील उथळ समुद्रात मोठ्या युद्धनौकांना अनेकदा मर्यादा येतात. अशा भागात प्रभावीपणे काम करण्यासाठी ‘आयएनएस मंगरोल’ची रचना करण्यात आली आहे. नौकेवर अत्याधुनिक सोनार प्रणाली, हलक्या वजनाचे टॉरपीडो आणि पाणबुडीविरोधी रॉकेट्स तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाखालील पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची नौदलाची क्षमता अधिक मजबूत होणार आहे. (INS Mangrol)



२५ नॉट्स वेगाने धावणार :


‘आयएनएस मंगरोल’मध्ये (INS Mangrol) अत्याधुनिक वॉटरजेट प्रपल्शन सिस्टीम बसवण्यात आली आहे. या प्रणालीमुळे नौकेला सुमारे २५ नॉट्सचा वेग गाठता येतो. ही नौका सलग १४ दिवस समुद्रात मोहिमेवर राहण्यास सक्षम असल्याचं सांगण्यात आलं आहे. पाणबुडीविरोधी मोहिमांव्यतिरिक्त किनारपट्टीची गस्त, शोध आणि बचावकार्य तसेच इतर सागरी सुरक्षा मोहिमांमध्येही या नौकेचा वापर केला जाऊ शकतो. (INS Mangrol)



गुजरातच्या ‘मंगरोल’ बंदरावरून नाव :


या युद्धनौकेचं नाव गुजरातमधील ऐतिहासिक मंगरोल बंदरावरून ठेवण्यात आलं आहे. जुन्या ‘मंगरोल’ माईनस्वीपरचा वारसाही ही नौका पुढे घेऊन जाणार आहे. जुनी नौका १९८३ ते २००४ या काळात भारतीय नौदलाच्या सेवेत होती. (INS Mangrol)



नौदलाच्या पाणबुडीविरोधी क्षमतेत वाढ :


उथळ समुद्रातील पाणबुडीविरोधी कारवायांसाठी लहान, वेगवान आणि अत्याधुनिक युद्धनौकांची गरज लक्षात घेऊन ASW-SWC प्रकल्प हाती घेण्यात आला. ‘माहे’, ‘मालवण’नंतर आता ‘मंगरोल’च्या (INS Mangrol) समावेशामुळे भारतीय नौदलाची किनारपट्टीवरील पाणबुडीविरोधी क्षमता आणखी मजबूत झाली आहे. (INS Mangrol)


 

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि