Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी मोक्का (MCOCA) अंतर्गत केलेल्या कारवाईचे विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह संपूर्ण पोलिस पथकाचे त्यांनी अभिनंदन केले. (Dr. Neelam Gorhe)


डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली १३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे PCPNDT आणि MTP कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस व आरोग्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली होती. या बैठकीत गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपातामागे संघटित गुन्हेगारी आढळल्यास केवळ PCPNDT कायद्यांतर्गत कारवाई न करता मोक्कासारख्या कठोर कायद्याचा वापर करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या होत्या. (Dr. Neelam Gorhe)



यानंतर करवीर तालुक्यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी ११ आरोपींच्या टोळीविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार केला. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कायदेशीर निकषांची पडताळणी केल्यानंतर या कारवाईला मंजुरी दिली. गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या प्रकरणात राज्यातील ही पहिली मोक्का कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


या कारवाईबाबत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, कोल्हापूरच्या बैठकीत संघटित स्वरूपात सुरू असलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या साखळीवर कठोर कारवाईची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली होती. पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन मोक्काअंतर्गत केलेली कारवाई महत्त्वाची असून, यामुळे अशा गुन्हेगारी टोळ्यांना कठोर संदेश गेला आहे. (Dr. Neelam Gorhe)


दरम्यान, राज्यात संघटित पद्धतीने गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या टोळ्यांची माहिती संकलित करून PCPNDT, MTP तसेच आवश्यकतेनुसार मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचे हे मॉडेल राज्यभर राबवावे, अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी