Nashik Crime News : 'माझा नाद सोडून दे, माझे...', प्रेम नाकारल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

Nashik Crime News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि त्याच्या नवीन प्रेयसीच्या छळाला कंटाळून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना पेठ रोडवरील (Peth Road) पिंगळेनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) प्रियकर व प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik Crime News )



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता दहावीत शिकत असताना संशयित (Suspected) दिशांत आहिरे याच्याशी तिची मैत्री झाली होती. पुढे मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दरम्यान, पुढे दिशांतचे ‘खुशी’ नावाच्या दुसऱ्या एका मुलीशीही प्रेमसंबंध जुळले. यानंतर दिशांत याने पीडितेला माझा नाद सोडून दे, माझे खुशीसोबत प्रेमसंबंध आहेत असे सांगून तिच्याकडे दुर्लक्ष करणे आणि मानसिक त्रास देणे सुरू केले. खुशी हिने देखील पीडित अल्पवयीन तरुणीची भेट घेऊन तू दिशांतचा नाद सोडून दे असे धमकावत व वाद घालत सातत्याने मानसिक त्रास दिला, असा आरोप आहे. (Nashik Crime News )



यानंतर, दोघांच्या सततच्या होणाऱ्या जाचाला व मानसिक त्रासाला कंटाळून अखेर सतरा वर्षीय तरुणीने ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी पिंगळेनगर येथील राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला आत्महत्येबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास केला असता हा प्रकार समोर आला. तपासानंतर २३ ऑगस्ट रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) संशयित दिशांत आहिरे व खुशी (दोघे रा. नाशिक) यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके यांच्या सूचनेने उपनिरीक्ष म्हस्के करत आहेत. दोघांच्या अटकेची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार