पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली जाते. मात्र, पुण्यातील एका प्रसिद्ध बेकरीमधून खरेदी केलेल्या खाद्यपदार्थात चक्क जिवंत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर खाद्यपदार्थांच्या स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पॉल बेकरीच्या खाद्यपदार्थात अळी आढळल्याचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर परिसरातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये असलेल्या पॉल बेकरीमधून विनोद टिळेकर यांनी २४ ऑगस्ट रोजी काही खाद्यपदार्थ खरेदी केले होते. हे पदार्थ घरी नेल्यानंतर खाण्यासाठी पॅकिंग उघडले असता त्यामध्ये जिवंत अळी आढळल्याचा दावा ग्राहकाने केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
View this post on Instagram
या प्रकारामुळे ग्राहकाला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी संबंधित खाद्यपदार्थांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपला संताप व्यक्त केला.
या घटनेमुळे पॉल बेकरीमधील स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर बेकरी व्यवस्थापनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या आधी देखील पॉल बेकरीमधील अन्नात अळी आढळली होती. गुरुग्रामधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






