
Prahaar Marathi News Live Updates: भूकंपाचे धक्के जाणवल्याने विमानतळावर उडाला गोंधळ
कॅलिफोर्नियातील काही भागात भागाला 5 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला, परंतु कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची नोंद नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू लॉस एंजेलिस शहराच्या नैऋत्येला असलेल्या मॅनहॅटन बीच या किनारी शहरापासून 5 किमी नैऋत्येस होता.
Prahaar Marathi News Live Updates: पूर्व अफगाणिस्तानातील शाळेत स्फोट; 10 ठार, 110 जखमी
पूर्व अफगाणिस्तानमधील कुनार प्रांतातील एका प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 110 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी बहुतांश मुले आहेत.
Prahaar Marathi News Live Updates: अमेरिकेच्या हवाई दलाच्या क्लाउड कॉम्प्युटिंग प्रणालीमध्ये केली घुसखोरी
हॅकर्सनी अमेरिकी हवाई दलाच्या क्लाउड कॉम्प्युटिंग प्रणालीमध्ये घुसखोरी केली. या घटनेची माहिती असलेल्या एका व्यक्तीनुसार, ही घुसखोरी किरकोळ होती आणि त्याचा कोणत्याही मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाच्या किंवा गोपनीय प्रणालींवर परिणाम झाला नाही. अमेरिकेच्या हवाई दलाच्या क्लाउड कॉम्प्युटिंग प्रणालीमध्ये केली घुसखोरी
Prahaar Marathi News Live Updates: दिल्लीच्या विश्वास नगरमधील ई-रिक्षा चार्जिंग स्टेशनला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू
विश्वास नगरच्या लेन क्रमांक ११ मधील एका घरात लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. ही आग ई-रिक्षा चार्जिंग पॉईंटमुळे लागल्याचे वृत्त आहे.
watch | Delhi | Four dead after fire broke out at a house in Lane No. 11, Vishwas Nagar, reportedly sparked by an e-rickshaw charging point https://t.co/RWgB0xczPu
— ANI (@ANI) November 29, 2026
Prahaar Marathi News Live Updates: पंतप्रधान मोदी आज डॉ. भूपेन हजारिका यांच्या जयंती सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार
पंतप्रधान मोदी सायंकाळी ६ वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थित राहतील.
Prahaar Marathi News Live Updates:पतीच्या निधनानंतर सुनेचं दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध; संतापलेल्या सासऱ्याने प्रियकराला लोखंडी सळीने संपवलं!
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर एका विधवा महिलेचे दुसऱ्या विवाहित तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, या नात्याची माहिती समजल्यानंतर महिलेच्या सासऱ्याचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात सासऱ्याने सुनेच्या प्रियकरावर लोखंडी सळीने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेची चर्चा सुरू आहे.






