Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. घाऊक बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात मंदावल्याने किरकोळ बाजारात भाव प्रचंड वधारले आहेत. याचा थेट परिणाम दैनंदिन खरेदीवर झाला असून, ऐरवी किलोने कांदा खरेदी करणारे ग्राहक आता केवळ तातडीच्या गरजेपुरताच कांदा घेताना दिसत आहेत. वाढत्या महागाईमुळे मुंबईकरांच्या डोळ्यात खरोखरच पाणी आले आहे.



केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर ५९ टक्क्यांनी वाढून ४३.५३ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच काळात २७.३७ रुपये होता. त्याचप्रमाणे ठोक बाजारातील सरासरी दरही ६८ टक्क्यांनी वाढून ३५.५८ रुपये प्रति किलो झाला आहे. प्रमुख शहरांचा विचार केल्यास चेन्नईमध्ये कांदा ६० रुपये, दिल्लीत ५५ रुपये आणि कोलकत्त्यात ५३ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. या वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या राखीव साठ्यातून (Buffer Stock) स्वस्त कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेड (NAFED) या सरकारी संस्थांमार्फत किरकोळ बाजारात फक्त ३५ रुपये प्रति किलो दराने कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, चेन्नई, मदुराई, एरनाकुलम आणि गुवाहाटी या पाच मोठ्या शहरांमध्ये हा कांदा पुरवला जाईल आणि त्यानंतर गरजेनुसार इतर शहरांमध्येही त्याचा पुरवठा वाढवला जाईल. दरम्यान, नाशिकच्या मंडईतील कांद्याचे दर दिल्लीपेक्षा जास्त असल्याचे समोर आले असून, वाहतूक खर्च लक्षात घेता दिल्लीतील दर जास्त असणे अपेक्षित होते. यावरून बाजारात व्यापारी किंवा दलालांकडून सट्टेबाजी आणि कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, सरकार यावर कडक लक्ष ठेवून आहे.


सध्या देशात कांद्याचा पुरवठा पुरेसा असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. चालू वर्षासाठी सरकारकडे १.२१ लाख टन कांद्याचा मजबूत राखीव साठा उपलब्ध आहे. तसेच २०२५-२६ या वर्षात देशात सुमारे ३०७.३७ लाख टन कांद्याचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या उत्पादनाइतकेच आहे. कांदा लवकरात लवकर आणि मोठ्या प्रमाणावर विविध शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी सरकारने 'कांदा एक्सप्रेस' रेल्वेचा वापर लक्षणीयरीत्या वाढवला आहे. गेल्या वर्षी केवळ १४ रेल्वे फेऱ्यांद्वारे १२ हजार टन कांदा पाठवण्यात आला होता, तर यंदा तब्बल ८६ रेल्वे फेऱ्यांद्वारे ८८ हजार टन कांदा १६ मोठ्या शहरांमध्ये पाठवला जात आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सणासुदीमुळे दरवर्षी कांद्याचे भाव थोडे वाढतात, मात्र सरकारच्या या तत्पर निर्णयांमुळे कांद्याचे दर लवकरच नियंत्रणात येतील.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी