Tarun Tejpal : शरण या, तुरुंगात जा आणि शिक्षा भोगायला सुरुवात करा; नंतर...

नवी दिल्ली :  'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्कार प्रकरणी दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी अतिशय महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर सुनावणी होईल पण त्याआधी तेजपाल यांनी शरण येऊन तुरुंगात जाणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने तरुण तेजपाल यांना शरण येण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. तेजपाल तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचे प्रमाणपत्र सादर झाले तरच शिक्षेला दिलेल्या आव्हानावर सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले.



तरुण तेजपाल यांच्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर २२ सप्टेंबर रोजी एक न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊ शकते. पण त्याआधी दिलेल्या मुदतीच्या आत तेजपाल यांनी शरण येऊन तुरुंगात जाणे आवश्यक आहे. तेजपाल तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचे प्रमाणपत्र सादर झाले तरच त्यांच्या याचिकेवर सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले. याआधी तेजपाल यांनी शिक्षेला आव्हान देणारी याचिका करत शरण येण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने आधी शिक्षा भोगायला सुरुवात करा नंतरच याचिकेवर विचार होईल, असे सांगितले.



'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात कार्यरत असलेल्या ज्युनिअर महिलेवर गोव्यात कंपनीच्या कार्यक्रमादरम्यान बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोषी ठरवून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तेजपाल यांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची अर्थात सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. उच्च न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पण शरण येऊन तुरुंगात जाऊन शिक्षा भोगायला सुरुवात करा आणि शिक्षा भोगत असल्याचे प्रमाणपत्र सादर करा, यानंतरच याचिकेवर सुनावणी करता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.



तेजपाल यांच्याकडून कपिल सिब्बल तर गोवा सरकारच्यावतीने देशाचे महाधिवक्ता (सॉलिसिटर जनरल) तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. सुनावणीवेळी तेजपाल यांच्यावतीने असा दावा करण्यात आला की, पुरावा म्हणून सादर केलेले सीसीटीव्ही फूटेज तसेच व्हॉट्सॲप संदेश, ईमेल आणि इतर साक्षी या आरोप करताना दिलेल्या माहितीशी विसंगत आहेत. पण या सर्व मुद्यांवर सविस्तर सुनावणी घेण्याची तयारी दाखवताना सर्वोच्च न्यायालयाने आधी तेजपाल यांना आधी तुरुंगात जाऊन शिक्षा भोगण्यास सुरुवात करा, असे स्पष्ट बजावण्यात आले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये